वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार
प्रदेश काँग्रेस चे सोशल मीडियाचे नूतन सरचिटणीस हरीराम कुलकर्णी यांनी ग्रंथ देवुन आभार मानले
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे वैद्यकिय मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गेल्या आठवडयात भेटायला येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोरोना मुळे हार, पुष्पगुच्छ न आणता यापुढे केवळ पुस्तक भेट द्यावी अशा सूचना एका बैठकीत दिल्या होत्या त्या सूचनेची दखल घेऊन नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया चे सरचिटणीस म्हणून हरीराम कुलकर्णी यांची निवड झाल्याने त्यांनी शुक्रवारी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथे आभार व्यक्त करण्यासाठी गेले कुठलेही पुष्पगच्छ न देता कुलकर्णी यांनी समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध हा ग्रंथ देवुन त्यांचे आभार व्यक्त केले त्याबदद्ल पालकमंत्री अमित देशमुख यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आहे.
यावेळी नूतन प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया चे सरचिटणीस तथा जिल्हा काँग्रेस मीडिया चे अध्यक्ष हारिराम कुलकर्णी यांनी आपण जी संधी काम करण्याची दिली आहे त्या संधीचे सोने करून काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात मीडियाच्या माध्यमातून अधिक चांगले काम करण्याची ग्वाही देत तसेच राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख याचेही आभार व्यक्त केले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, माजी मनपा सभापती राजकुमार जाधव, जिल्हा मागासवर्गीय काँग्रेस सेल चे अँड बाबासाहेब गायकवाड, अहमदपूर काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष राजकुमार पाटील, माजी महापौर अँड दिपक सुळ, नगरसेवक रविशंकर जाधव, सचिन बंडापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.