स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलचा एकतर्फी विजय
कव्हा ग्रामपंचायतीचा लक्षवेधी निकाल ः कव्हेकरांनी कव्ह्याचा गड कायम राखला
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील कव्हा ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कव्ह्यामध्ये दोन पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, शिक्षकतज्ज्ञ गोविंदराव घार, युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलने 11 जागेवर एकतर्फी विजय मिळवून कव्ह्याची विजयी पताका कायम असल्याचे सिध्द केलेले आहे. तर कव्हा परिवर्तन विकास पॅनलला दारून पराभव स्वीकारावा लागला. हे वास्तव आहे. त्यामुहे कव्हेकर नेहमी विकासाच्या बाजूनेच राहतात. हे निकालाअंती समोर आले आहे.
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गेल्या 40 वर्षामध्ये कव्हा या गावचा चौफेर विकास केलेला आहे. त्यामुळे या कामाची पावती म्हणून कव्हेकरांनी स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलला एकतर्फी विजय मिळवून देण्याचे काम केलेले आहे.
कव्हा स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलच्या माध्यमातून शिवशरण गदगेअप्पा थंबा, पद्मीनी ज्ञानोबा सोदले यांनी वार्ड 1 मधून विजय मिळविला. तर किशोर भानुदास घार, पुजा दत्तात्रय मामडगे, नाजीमा रसूल पठाण, वार्ड 3 मधून सदाशिव गणपती सारगे, आनिता मोहन घोडके, नेताजी तुकाराम मस्के, नामदेव धोंडीराम मोमले, कांचन कमलाकर होळकर, पूनम गोपाळ सारगे, अशा एकून 11 जणांनी कव्हा परिवर्तन विकास पॅनलचा दणदणीत पराभव करून माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, शिक्षकतज्ज्ञ गोविंद घार, युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलने 11 जागेवर एकतर्फी विजय मिळवून कव्ह्याची विजयी पताका कायम असल्याचे सिध्द केलेले आहे. त्यामुळे स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅलनच्या सर्व विजयी उमेदवाराचे कव्हा गाव व परिसरातून कौतुक होत आहे.
बिनविरोध निवडणुकीची पंरपरा खंडीत करूनही कव्हेकर कव्हेकरांच्याच बाजूने माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी गावच्या चौफेर विकासासाठी गेल्या 40 वर्षापासून सरपंचाची बिनविरोध निवड करून विकासाचा पायंडा कायम सुरू ठेवला गावचा चौफर विकास झाला असतानाही विरोधासाठी विरोध म्हणून गावातील विघ्नसंतोषी व्यक्तीनी कव्हा परिवर्तन विकास पॅनल या नावाने विरोधी पॅनल तयार करून निवडणुका घेण्यास भाग पाडले. परंतु कव्ह्यातील सुज्ञ मतदारांनी विकासाच्याच पाठीशी उभे राहून स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलच्या माध्यमातून 11 जागेवर प्रचंड बहुमतांनी एकतर्फी विजय मिळवून दिला. तर कव्हा परिवर्तन विकास पॅनलला दारून पराभव स्वीकारावा लागला. यातील किमान सहा उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झाल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे यापुढील काळातही कव्हेकर विकासाची भूमिका पुढे घेवून चालणार्या कव्हेकरांच्याच बाजूने राहणार असल्याची चर्चा सुजाण नागरीकांतून बोलली जात आहे.