आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून कृषी कायद्याचे कौतूक – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांसाठी तीन कृषी कायदे लोकसभा व राज्यसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने मंजूर मरून घेतले व त्याला राष्ट्रपतीनेही मान्यता दिली. लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने कायदे करून शेतकर्याला आर्थिक सुबकता व स्थैर्य देण्याचा प्रयत्न पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. या कायद्याचे कौतूक आंतरराष्ट्रीय नाने निधी (आय.एम.एफ) चे डायरेक्टर गेरी राईस यांनी केले असून या कायद्यामुळे शेतकरी थेट खरेदीदाराच्या संपर्कात येणार असल्यामुळे दलाली बंद होणार आहेत. तसेच यामुळे शेतकर्याचा अधिक फायदा होणार असल्याचे वक्तव्य गेरी यांनी केले आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान पी.व्ही.नसिंहराव यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली डॉ.मनमोहनसिंग साहेबांनीच मॉडल अॅक्ट आणून खाजगी मार्केट कमिट्या काढण्यास परवानगी दिली. फळे भाजीपाला मुक्त केली, असे असताना शेतकरी प्रश्नाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँगे्रस पार्टीचे नेते करीत आहेत. शेतकरी व जनतेने या कायद्याला जाहीर पाठींबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते कृषी अभ्यासक मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे. मा.न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी 4 सदस्य समीती नियुक्त केली असताना आम्हाला ती मान्य नाही, अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. समीतीसमोर आपले प्रश्न मांडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी आ.कव्हेकर यांनी दिली.