पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे पुनःश्च हरिओम पालक मेळावा संपन्न

पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे पुनःश्च हरिओम पालक मेळावा संपन्न

उदगीर ( प्रतिनिधी ) : कोविड काळातील बंद असलेल्या प्रत्यक्ष शिक्षणाला दिनांक 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र सरकारने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. इयत्ता 5 वी पासून पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत. त्याच अनुषंगाने पालकांना मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी उदगीर येथील नामांकित पोस्ते पोदार लर्न स्कूल ने पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.

या पालक मेळाव्यासाठी बीआरसी चे केंद्र प्रमुख बालाजी धमनसुरे, शिक्षक पालक संघटनेच्या सचिव अर्चना शेवाळे, सदस्य गजानन पाटील, दत्ता बिरादार, नवनाथ जोगी आणि शाळेचे प्राचार्य सूर्यकांत चवळे यांची मंचावर उपस्थिती होती.

मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्राचार्य सुर्यकांत चवळे यांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून शाळेने केलेल्या सर्व तयारीचे अवलोकन पालक वर्गास करून दिले आणि पुन्हा एकदा हा शैक्षणिक अग्निकुंड तेवत ठेवू या आणि विध्यार्थ्यांना घडवूया, असे पालकांना आवाहन केले.

बालाजी धमनसुरे यांनी अध्यक्षीय समारोपात पोस्ते पोदार मागील काळापासून करत असलेल्या कामाचे कौतुक केले. ऑनलाईन पद्धतीत सुद्धा पोस्ते पोदार क्रमांक एक ची शाळा होती तशीच ती प्रत्यक्ष शिक्षण पध्द्तीत सुद्धा राहील असा विश्वास बोलताना त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुम मुजावर यांनी केले तर आभार शेषेराव बिरादार यांनी मानले.

उपस्थित पालक वर्गानी शाळेने केलेल्या तयारीचे कौतुक केले आणि या निर्णयास प्रचंड प्रतिसाद दिला.

About The Author