राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्‍यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्‍यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !

उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस श्री बारोळे गोविंद सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, सत्य,अहिंसा, स्वावलंबन, स्वदेशी वस्तूचा वापर या सर्व गोष्टींचा स्वतःच्या आचरणातून संपूर्ण देशाला मोलाचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी दिला. अहिंसा, सत्याग्रह,असहकार आंदोलन या माध्यमातून जुलमी ब्रिटिश राजवटीला विरोध करणारे राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समर्पण केले., त्यांचे हे अनमोल कार्य भारतीय कधीही विसरणार नाहीत असे मनोगत मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी व्यक्त केले. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री नामदेव हाके यांनी त्यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतामध्ये दिली. जय जवान जय किसान हा नारा देऊन देशाच्या प्रगतीमध्ये किसान आणि जवान यांचे महत्व आहे हे सांगितले, देश हिताचे खूप मोठे चांगले निर्णय लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान असताना घेतले असे मनोगत व्यक्त केले. गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती यांच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी मन्मथ बिरादार, अनुष्का पाठक, करकरे यशवंत, सोनाक्षी कांडेकर, आयुष बोडके, दस्तुरे इ. विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे ऑनलाइन भाषण केले व दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. या कार्यक्रमास श्री सपाटे डि. यल., श्री गोखले वसंत, श्री बागडे सुनील,चेरेकर विष्णुकांत,बोळेगावे दिनेश, शेख सईद, नादरगे राहूल इ. शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्री हाके नामदेव यांनी व्यक्त केले.

About The Author