ओला दुष्काळ जाहीर करा व ऊसाची एक रक्कमी एफ आर पी द्यावी – राजू शेट्टी यांची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा व ऊसाची एक रक्कमी एफ आर पी द्यावी - राजू शेट्टी यांची मागणी

तेर (सागर वीर) : वाघोली येथे आले असता प्रथम महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली या वेळी संघटनेचे प्रांत अध्यक्ष पोपळे सर तसेच जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे साहेब उपाध्यक्ष धनाजी पेंदे तुळजापूर तालुका अध्यक्ष नेताजी जमदाडे, दुर्वास भोजने, ओबीसी सेलचे राजाभाऊ हाके यांच्या सह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आज उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहेब, यांची जाहीर सभा झाली. या कार्यक्रमाला आदरणीय श्री रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती होती, श्रीमान राजू शेट्टी साहेब यांनी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई द्यावी तसेच वीमा द्यावा, ऊसाची एक रक्कमी एफ आर पी द्यावी यासाठी सरकारने ताबडतोब या सर्व गोष्टींचा विचार करून आठ दिवसांत बॅंकेच्या खात्यात जमा करावे अन्यथा मोठ्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असंही सरकारला सुनावले.

यावेळी श्रीयुत राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखाने ऊसाला जास्त भाव देतात पण इकडे का नाही असा प्रश्न उपस्थित केला याचं कारण म्हणजे तिकडील शेतकऱ्यांचं संघटन मजबूत आहे इकडे ही असं संघटन मजबूत करा मग बघा काय होतय ते, असं श्री शेट्टी साहेब यांनी म्हटले आहे यावेळी वाघोली परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्म राज पाटील यांनी केले तर आभार रामकृष्ण पाटील यांनी केले यावेळी तालुक्यातील काजळा, रामवाडी,तेर येथील पीक नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला.

About The Author