सफाई कामगारांचा सत्कार, माझं घर माझी बाग पुरस्कार

भाजपा महिला आघाडीचा अनोखा उपक्रम
यवतमाळ (प्रतिनिधी) : महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती दिनी माजी पालकमंत्री आ. मदन येरावार , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा शहराध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनात, महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ उषा खटे यांच्या | नेतृत्वात भावे मंगल कार्यालयात, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला सफाई कामगारांचा सत्कार व माझं घर माझी बाग यां राबवलेल्या उपक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले . माझं घर माझी बाग त्यांच्या परीक्षक म्हणून लाभलेल्या डॉ सुधाताई खडके व सौ विद्याताई खडसे यांनी स्पर्धकांची क्रमांक काढून त्यांना प्रोत्साहित केलं.प्रोत्साहनपर तीन बक्षिसे देण्यात आले, आणि पहिला दुसरा तिसरा अशी पण बक्षिसे आली.कार्यक्रमामध्ये महिलांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली. आ. मदन येरावार यांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत जे कार्यक्रम घेण्यात आले, त्यांचा आढावा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ मायाताई शेरे यांनी घेतला. शहरांमध्ये अनेक ठिकाणी केंद्रामधील योजनेच्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन १७ सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येक वॉर्डात योजनेच्या लाभार्थीना घेऊन बैठक लावण्यात आल्या तसेच त्यांना सन्मानपत्र सुद्धा देण्यात आले.यावेळी आ. मदन येरावार यांनी सर्व महिलांना केंद्रातल्या योजना सोबतच बचत गटाच्या माध्यमातून जो व्यवसाय आपण करत आहात त्याचे मार्केटिंग करता येईल याबद्दल सुद्धा माहिती दिली. तसेच या कर्यक्रमावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भुतडा म्हणाले की महिलांनी यवतमाळ शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात सेवा सप्ताह हा छान उपक्रम राबविला त्याबद्दल मी भाजपा महिला आघाडीचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन भाजप महिला शहर अध्यक्ष यवतमाळ सौ उषा खाटे यांनी केले असून उपस्थितांचे आभार प्रांजली राऊत यांनी मानले यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगिलवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राजक्ता टिकले, माणिक पांडे , किर्ती तायडे ,सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष स्मिता भोईटे, भाजपा जिल्हा सचिव शैला मिर्धापुरे, आरोग्य सभापती साधना काळे, नियोजन सभापती चंद्रभागा मडावी, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा ब्राह्मणकर ,शहर सरचिटणीस भारती जाठे, रेखा नंदुरकर, माधुरी दायरा ,मीनल पांडे ,रचना शेंडे, नगरसेविका नंदा जिरापुरे, शुषमा राऊत, करुणा तेलंग, शहर उपाध्यक्ष सविता जाधव,,प्रणिता खडसे, अपर्णा परसोडकर ,शिल्पा मुथलवार, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.