महाराष्ट्र अल्पसंख्यांक कर्मचारी संघटनेच्या वतीने चेअरमन गोपाळ पडिले यांचा सत्कार

महाराष्ट्र अल्पसंख्यांक कर्मचारी संघटनेच्या वतीने चेअरमन गोपाळ पडिले यांचा सत्कार

पडिले यांच्या सेवाव्रत्ती ची योग्य दखल

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर रेणापूर शिक्षक सोसायटीचे चेअरमन गोपाळ पडिले यांची स्विक्रत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्यांक कर्मचारी संघटना शाखा रेणापूरच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात शाल,श्रीफळ,पुष्पहार व पेढे भरवून यथोचित सत्कार करण्यात आला व संघटनेच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी केंद्रप्रमुख इक्रामुल्ला तांबोळी व बालरक्षक नजीऊल्ला शेख यांनी गोपाळ पडिले यांच्या कार्यकर्तत्वार आपले विचार मांडले.

यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष शेरखाँ मुजावर, मुख्याध्यापक माजिद शेख, कक्ष अधिकारी जावेद पांढरे, वरिष्ठ सहाय्यक ईस्माईल मुल्ला, बालरक्षक नजीऊल्ला शेख, डायट विषयतज्ञ आयूब शेख, केंद्रप्रमुख इक्रामुल्ला तांबोळी, आसिफ शेख यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!