लाखो लोकांचें संसार सुधारवयाचे का बिघडवयाचे तुमच्या हातात – दिलीपराव देशमुख

लाखो लोकांचें संसार सुधारवयाचे का बिघडवयाचे तुमच्या हातात - दिलीपराव देशमुख

जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा बँकेची भूमिका महत्वाची

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागच्या 35 वर्षात लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर. ,माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी बँकेच्या कारभारात पारदर्शकता ठेवली त्यामूळे आर्थिक विकासाला मोठी मदत जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाली त्या काळात बरेजची साखळी उभी झाली हे मांजरा नदीमुळे लाखो साठवण तलाव बांधले गेली यामागे जिल्ह्यांतील तत्कालीन नेते मंडळी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत त्यामूळेच आज जिह्यातील सहकारी सोसायटी एक लाख रूपये कर्ज देणारी एक कोटी रुपयांच्या घरात गेले यामागे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोठा वाटा जिल्ह्यातील विकासात योगदान राहीलेले आहे हे विसरता येणार नाही असे स्पष्ट करून लाखो लोकांचें संसार बसवणारी लातूर जिल्हा बँक सुधरावयाची का? बिघडवयाची हे काम तुमच्या हातात आहे राग, लोभ, वैक्तिक हेवेदावे विसरून जावून लक्ष द्यावे लागणार आहे ही बँक बँकिंग सेवा करते सावकारी करत नाही सामाजिक भूमिका निभवते त्यासाठी आपण जागे रहा येणाऱ्या निवडणुकीत आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना ताकत द्या असे सांगून जिल्हा बँक बिनविरोध निवडून दिल्यास मला आनंदच वाटेल असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला ते मंगळवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 अनुषंगाने लातूर जिल्हा पतसंस्था मतदार संघ, जिल्हा मजूर फेडरेशन, चाकुर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मतदार यांच्यासोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्यांचे चेअरमन सर्जेराव मोरे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा मजूर फेडरेशन चे चेअरमन दिलीप पाटील नागराळकर, बँकेचे संचालक यशवंतराव पाटील, संचालक एन आर पाटील, संभाजी सुळ, अँड प्रमोद जाधव,सुधाकर रुकमे, सौ स्वयप्रभा पाटील, मजूर फेडरेशन चे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी संचालक अशोक गोविंदपूरकर, चांदपाशा इनामदार, हरिराम कुलकर्णी, लालासाहेब चव्हाण, रामदास पवार उपस्थित होते.

३५ वर्षांत जिल्हा बँकेने लोकांना विश्वास दिला आम्ही कमवला

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या देशात सर्वप्रथम पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय लातूर जिल्हा बँकेने घेवून इतिहास घडवला आहे जिल्हा बँक ही ग्रामीण भागातील लोकांच्या प्रपंचाची काळजी घेणारी मातृत्वाच्या सावलीत आहे माञ येणाऱ्या निवडणुकीत एकही मत चुकून इकडे तिकडे गेले तर गावातली ५०० कुटुंबाचे नुकसान होते याकडे लक्ष द्यावे काळजी घ्यावी लागणार आहे त्या कुटुंबासाठी पॅनल ला मतदान आम्हाला द्या त्यामूळे शेतकरी सभासद सुरक्षित राहतील जूने नवे वांदे बाजूला काढा फक्त आपली लातूर जिल्हा बँक टिकली पाहिजे असं सांगा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्याचे वेगळेपण जपले

राजकारणाच्या पलिकडे जाऊन आम्ही कुणाचे दुश्मन नाहीत वैक्तीक हेवेदावे नाहीत त्यांचे विचार ते व्यक्त करतात आम्हीं वेगळ्या विचाराचे आहोत आम्ही मागच्या ३५ वर्षांत राजकारणात वेगवेगळ्या समाजातील लोकांना बँकेत संधी दिली त्यात राज्यात केवळ लातूर जिल्हा बँकेने महिलेला चेअरमन पदाचा मान दिला हे लातूरच्या नेतेमंडळींनी करून दाखवले आहे त्यापुढे जाऊन जिल्हा परीषद ओपन अध्यक्ष असताना साहेरा मिर्झा या मुस्लिम महिलेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद दिले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दलीत व्यक्तीला दिवंगत अँड हरिश्चंद्र शिरसाठ यांनी उपाध्यक्ष पद भोगले आज दलीत उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ म्हणून कार्यरत आहेत त्यामूळेच सगळ्यांना संधी द्यायचं धोरण स्वीकारले आहे पुढेही कायम राहील यासाठी जिल्ह्यातील आर्थिक सामाजिक उन्नती चालू ठेवण्यासाठी आमच्या पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, मजूर संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर बँकेचे संचालक एन आर पाटील, माजी संचालक अशोक गोविंद पूरकर, मोहन हाके, राजकुमार भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा बँकेने प्रामाणिक पने कार्य करत लोकांनाआधार दिला

यावेळी बोलताना बँकेचे संचालक एन आर पाटील यांनी जिल्हा बँकेचे कामकाज दूरदृष्टी असलेले नेते दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या पाच वर्षांत काम करण्याची संधी मिळाली त्यामूळे शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मोठा आधार देण्याचे जिल्हा बँकेने काम केले आहे त्यामूळे येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार कोणीही असेल त्या च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास व्यक्त केला.

सर्वसामान्यांची लातूर जिल्हा बँक

यावेळी बोलताना बँकेचे माजी संचालक अशोक गोविंद पुरकर यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या बँकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील लोकांना आधार देत आर्थिक मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे त्यामुळं या नेतृत्वाने सर्वसामान्यांना मोठे करण्याचे काम केले आहे हे नेतृत्व जपलं पाहिजे सर्वसामान्याला धावून जाणारी जिल्हा बँक असून त्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब ज्यांना उमेदवा री जाहीर होईल त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची उपस्थित लोकांनी स्वागत केले एकदिलाने काम करत बँकेचे वेगळे पना बरोबर नेत्यांचं वेगळेपण जपले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी संवाद मेळाव्यास शंकरराव चव्हाण मांजरीकर, विठ्ठलराव माकने, रवीशंकर बरमदे, महादेव खिच डे, दयानंद बिडवे, राजकुमार पाटील, संतोष देशमुख, महादेव मुळे, प्रकाश देशमुख, सतिश पाटील वडगावकर, राजेन्द्र जाधव, लायक पटेल, पाटील अच्युत, संतोष पाटील, चंद्रचुड चव्हान, सतिश भोसले, तसेच जिल्हा मजूर फेडरेशन, सहकारी पतसंस्था सभासद, चाकुर तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा.लोंढे यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले..

About The Author