शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती शासन स्तरावर साजरी करा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथे सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती शासकीय कार्यालयात व शासन स्तरावर जसाीर करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याडे जिल्हाधीकारी यांचे मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भुमी असून महाराष्ट्राच्या सामाजीक व सांस्कृतीक जडण घडणी मध्ये ज्या महापुरुषांचा वाटा आहे त्यापैकी शिवरत्न जिवाजी महाले यांचे हिंदवी स्वराज्य स्थापने मध्ये अनुलनीय योगदान आहे. ‘होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’ अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तसेच ऐतिहासीक महापुरुष शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जिवनकार्या विषयी माहिती इतिहासाच्या इयत्ता 1 ली ते 10 वी च्या अभ्यासक्रमात स्वतंत्र धडा ठेवण्यात यावा. तसेच शिवरत्न जिवाजी महाले यांच्या नावाने शौर्य पुरुस्कार अतुलनिय कार्य करणार्यासाठी देण्यात यावा. संत शिरोमणी श्री संत सेना महाराज या संता विषयी मराठी भाषेच्या इयत्ता 1 ली ते 10 वी च्या अभ्यासक्रमामध्ये संत बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल समावेश करण्यासाठी शिक्षण मंडळास आदेश काढावेत, तसेच बारा बलुलेदार (वंचित ओबीसी) साठी विकास महामंडळ स्थापन करून आर्थीक बजेटची पुर्तता करावी. ओबीसी व व्ही जे एन.टी. समाजाची जातनिहाय जनगणना करावी. भटक्या विमुक्ताचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम करण्यात यावे अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश सचिव प्रा. धनंजय बेडदे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. माधव कोळगावे, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास आकनगीरे, नाभिक समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे, युवक अध्यक्ष अमोल सावंत, नाभिक असो. अध्यक्ष जगन्नाथ गवळी, जि. उपाध्यक्ष दिनकर दिघे, आण्णा सुरवसे, बालाजी सुर्यवंशी, राजु गवळी, भगवान काळे, गोकुळ राऊत, अविनाश इबितदार, अंकुश पवार आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.