पळशी ग्रामपंचायतीवर आदर्श ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
विजयाची परंपरा कायम : सत्तेचे सुत्रे पुन्हा जाधवांच्याच हाती राहण्याची शक्यता
लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील ग्रामपंचातीच्या निवडणुकीत आदर्श ग्रामविकास पॅनल व परिवर्तन ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये झालेल्या दुरंगी चुरशीच्या लढतीत 7 जागेपैकी 6 जागेवर आदर्श ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. तर एक जागा विरोधकांच्या हाती गेलेली आहे. तरीही पळशी गावचे सर्वेसर्वा देविदासरावभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयामुळे गावच्या विकासाला चौफेर गती मिळणार आहे.
आदर्श ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून उद्योजक उध्दवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली वार्ड 1 मधून वर्षा गुणवंत भंडारे, मिरा परमेश्वर जाधव यांनी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळविला आहे. वार्ड 2 मधून दशरथ गोविंदराव जाधव, अंजलीताई चंद्रकांतराव जाधव यांनी विजय मिळविला आहे. तर वार्ड 3 मधून गंगाधर रानबा शिंदे, वंदना नानासाहेब पुरी यांनी प्रंचड मताधिक्य घेवून विजय मिळविलेला आहे. विकासाचा जाहीरनामा नसतानाही केवळ उमेदवारांच्या विश्वासावर मतदान देवून मतदारांनी विजयाची पताका आदर्श ग्रामविकास पॅनलच्या गळ्यात घातलेली आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा देविदासराव जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी दगडूसाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, बब्रुवान शिंदे, भास्कर शिंदे, श्रीहरी जाधव, काकासाहेब जाधव, रमेश गायकवाड, भारत जाधव, राजाभाऊ जाधव, नामदेव कदम, दिगंबर जाधव, श्रीमंत जाधव, धनेश्वर शिंदे, सिध्देश्वर जाधव, बाळासाहेब जाधव, गुणवंत कदम, मुरली कदम, सटवा कदम, श्रीनिवास जाधव, दिपक जाधव, रामराव ढमाले, हणमंतराव जाधव, पांडूरंग जाधव, काकासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.