बिटरगावच्या लढतीत ग्रामविकास पॅनलची विजयी पताका

बिटरगावच्या लढतीत ग्रामविकास पॅनलची विजयी पताका

तिरंगी लढत : जनविकास पॅनलचा दारून पराभव तर वाकडेच्या पॅनलला वार्ड 2 मध्ये जीवदान

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील बिटरगावमध्ये ग्रामविकास पॅनल, जनकल्याण ग्रामविकास पॅनल, व जनविकास पॅनल यांच्यामध्ये झालेल्या तिरंगी लढतीत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आप्पासाहेब पाटील, माधवराव देशमुख, हरिभाऊ पाटील, दगडू आप्पाराव वाकडे, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ग्रामविकास पॅनलने सहा जागेवर दणदणीत विजय मिळविलेला आहे. तर तीन जागेवर जनकल्याण ग्रामविकास पॅनलला जीवनदान मिळालेले आहे. हंसराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनविकास पॅनलला मात्र दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे.

ग्रामविकास पॅनल बिटरगाव या पॅनलच्या माध्यमातून वार्ड 1 मध्ये महेंद्र माणिकराव पाटील, मंगलबाई सुधाकर आलापूरे, अनुसया राजाभाऊ गाडे वार्ड 3 मधून अक्षय बाबू उपाडे, माणिक जिगू राठोड, शिवगंगा एकनाथ हाणवते, अशा एकून सहा उमेदवारांना विजय मिळालेला आहे. वार्ड 2 मधील उमेदवारांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर जनकल्याण ग्रामविकास पॅनलच्या नवनाथ पंडीत वाकडे, सुधामती बळीराम बोडके, पुष्पा शिवाजी कामाळे या तीन उमेदवारांना वार्ड 2 मधून विजय मिळालेला आहे. तर हंसराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनविकास पॅनलच्या 8 उमेदवारांना दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर एका जागेवर उमेदवारच मिळाला नाही. एकंदर बिटरगावात झालेल्या तिरंगी लढतीत आप्पासाहेब पाटील, माधवराव देशमुख, हरिभाऊ पाटील, दगडू आप्पाराव वाकडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलला सहा जागेवर विजयाची कमान मिळालेली आहे. या पॅनलच्या विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author