आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटु मुलीची भर मैदानात कोयत्याने वार करून हत्या

आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटु मुलीची भर मैदानात कोयत्याने वार करून हत्या

पुणे (रफिक शेख) : पुण्यात एका १४ वर्षीय कबड्डीपट्टू अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असताना देखील आरोपीने तिची हत्या केली. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला.

बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती
हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. आरोपी हा अत्यंत संतापाने मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा प्रयत्न ओरपींचा होता की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका

मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलही होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!