श्यामार्य कन्या विद्यालय उदगीर येथे आज मा.शिक्षणाधिकारी यांच्या परीपत्रकानुसार हॅंडवॉश डे साजरा करण्यात आला.हात धुण्याचे शास्त्रीय कारण विज्ञान शिक्षक श्री कांबळे एम जीनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे आणि गर्दी टाळणे या सवयींबरोबरच वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे याबद्दल सरकारकडून माहिती दिली जातच आहे. मात्र जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने या सवयींमुळे आजारांपासून बचाव कसा केला जाऊ शकतो हे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगणे अपेक्षित आहे. ‘क्लीन हंस फॉर आॅल’ याखाली सप्ताह साजरा करणे, हात धुण्याच्या सवयीची आवश्यक साधने प्रत्येक घटकाला उपलब्ध करून देणे, हा केवळ कार्यक्रम न राहता प्रत्येकासाठी नित्याची सवय बनणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश असल्याचे अध्यक्षीय समारोपात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते यांनी सांगितले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त श्री जमादार विकास यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर करून दाखवले. प्रास्ताविक श्रीमती अणकल्ले तर आभार श्रीमती जेठुरेनी मानले.