शहरासह तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे
अन्यथा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल….
अहमदपुर (गोविंद काळे) : अहमदपुर शहर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या 9 शाळांतील विज्ञान ,एका शाळेतील भाषाविषय व दोन शाळेतील सामाजिक शास्त्र विषयाच्या शिक्षकांची रिक्त पदी त्वरित शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अन्यथा पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थी,नागरीकासह ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपुर च्या मार्फत वंचित बहुजन आघाडी अहमदपुर च्या वतीने देण्यात आले.
अहमदपुर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक उपलब्ध होणे गरजेचे आहे. अहमदपुर तालुक्यात 13 शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यांमध्ये किनगाव,हिप्परगा काजळ,हिप्पळगाव,मावलगाव,अंधोरी,काळे गाव,थोडगा या ,9 ठिकाणी विज्ञान विषयांचे तर जिल्हा परिषद कन्या शाळा अहमदपुर,भाषा विषयाचा शिक्षक तर अंथोरी सिंदगी बु,मांडणी येथे सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी सदरिल शाळांत 20/10/21 वार बुधवारी पर्यंत शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत अन्यथा 21/10/21 गुरुवारी नागरिक, विद्यार्थी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी अहमदपुर च्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, वंचित मार्ग दर्शक बाबुराव जंगापल्ले ,वंचितचे सुप्रीय भाऊ बनसोडे,ता अध्यक्ष सहदेव व्होनाळे,ता उपाध्यक्ष उत्तम गोरे, महासचिव सारिपुत्र ढवळे, उपाध्यक्ष विकास घोटे, प्रदिप दिपक राव जाधव,सचिव तबरेजभाई सय्यद, सचिव मंगेश स्वामी, प्रवक्ते बिलाला शेख,माळेगांव ग्रा प सदस्य शिवानंद कांबळे, मारोती भुरे पाटील,व्रजेद्र तुरेवाले आदी उपस्थित होते.