शहर व ग्रामीण भागातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा त्वरित लाभ द्या
अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार….
अहमदपुर (गोविंद काळे) : अहमदपुर शहरी व ग्रामीण भागातील जनतेला पंतप्रधान आवास योजना लाभ देण्यात यावा, अहमदपुर तालुक्यातील गावजोड रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, अहमदपुर शहरातील आंबेजोगाई रोडवर ए टी एम सुविधा उपलब्ध करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदपुर आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा जिल्हाधिकारी लातूर यांना उपविभागीय अधिकारी अहमदपुर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
अहमदपुर शहर व तालुक्यात 2022 पर्यंत पंतप्रधान आवास योजना लाभार्थी यांना घरे मिळणार अशी प्रशासनाकडून जाहिरात होत आहे पण प्रत्यक्षात सदर योजनेची अंमलबजावणी दोन वर्षांत दिसतं नाही, ज्यांना घरकुल मिळाले त्यांना अद्याप पहिला,दुसरा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे लोकं कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी ज्यांना घरकुल मिळाले आहे बांधकाम केले आहे त्यांना पैसे वितरीत करावे.
गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे शहर व ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते खराब झाले आहेत लोकांना रस्त्यावर चालता येत नाही,तरी सदर रस्त्याची कामे करुन वर्ष ही न झाल्याने संबंधित गुत्तेदार यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. अहमदपुर शहरातील आंबेजोगाई रोडवर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, ग्रामीण आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय, न्यायालय , नोटरी कार्यालय,बाॅड विक्रेते कार्यालय आहेत पण या परिसरात ए टी एम सुविधा उपलब्ध नाही , म्हणून ए टी एम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदपुरडुन ,तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, वंचित मार्ग दर्शक बाबुराव जंगापल्ले ,वंचितचे सुप्रीय भाऊ बनसोडे,ता अध्यक्ष सहदेव व्होनाळे,ता उपाध्यक्ष उत्तम गोरे, महासचिव सारिपुत्र ढवळे, उपाध्यक्ष विकास घोटे, प्रदिप दिपक राव जाधव,सचिव तबरेजभाई सय्यद, सचिव मंगेश स्वामी, प्रवक्ते बिलाला शेख,माळेगांव ग्रा प सदस्य शिवानंद कांबळे, मारोती भुरे पाटील,व्रजेद्र तुरेवाले आदी उपस्थित होते.