शासकीय ग्रामिण रुगाणालयात व्यसनाधीन रावणाचा दहन

शासकीय ग्रामिण रुगाणालयात व्यसनाधीन रावणाचा दहन

सृजन संस्थेचा व्यसनमुक्ती अभियानांतर्गत उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : विजयादशमीचे औचित्य साधून शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपुर व सृजन संस्थेच्या वतीने व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यसनाधीन रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी डॉ.दत्ता बिरादार, डॉ. धीरज देशमुख ,डॉ. सुरजम सिहांते,डॉ. अपर्णा मेकले,परिचारीका सुनिता पारधी,जयश्री पडिले सहाय्यक कर्मचारी किशोर सातपुते, गोविंद कच्छवे,बस्वराज लोहारे,रमेश मुंडे,किशोर सातपुते,कलाध्यापक तुकाराम देवकत्ते,महादेव खळुरे,व अविनाश धडे, कैलास मोरतळे,आदिच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात आले.

युवा पिढी व्यसनाचे शिकार बनत आहेत.भारतातील कर्करोगाची संख्या यावर्षी १३.९ लाख असून ती २०२५ पर्यंत १५.७ लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद (आयसीएमआर) या बंगलोर येथील राष्ट्रीय रोग सूचना विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीडीआयआर) यांनी व्यक्त केला आहे. अहवालानुसार यंदा पुरुष कर्करोगाची संख्या सहा लाख ७९ हजार ४२१ एवढी गृहीत धरली असून २०२५ पर्यंत ती सात लाख ६३हजार ५७५ पर्यंत पोहोचेल.यात महिलांना कर्करोग होण्याचे प्रमाण या वर्षी अंदाजे सात लाख आहे तर २०२५ पर्यंत बारा लाख होण्याची चिन्हे आढळून येत आहेत.

वरील गोष्टीचा विचार करुन राज्यातुन सर्वच स्तरावरुन विरोध करणे अपेक्षित आहे.व्यसन हे शरिरासाठी हाणिकारकच आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनापासून अनेक अजार उद्वभतात.यामूळे तंबाखू,गुटखा,सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थावर व उत्पादनावर कडक बंदी लादली गेली पाहिजे.या उद्देशाने सृजन संस्थेच्या वतीने हा व्यसनमुक्त समाज जनजागृती साठी उपक्रम राबविण्यात आला. बाल कलावंत श्रीनिवास धडे यांनी टाकाऊ वस्तूपासून दोन दिवसात हा रावणाचा पुतळा साकारला.प्रेम घंटेलवाड ,साखर भालके,ओम धडे, विविध धडे,आर्यन आपटे विकास धनेवाड,महेश खंडागळे, किशोर आडाव आदि विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.

About The Author