सर्व शासकीय योजनांची माहिती गावातच उपलब्ध करून देणार – प्रा. आण्णासाहेब मिरगाळे
निलंगा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. अनेक शेतकऱ्यांना त्या योजना माहिती नसतात व काही योजनांची माहिती असते पण त्या योजनेसाठी कागदपत्राची पूर्तता करावी लागते त्यासाठी तालुकास्तरावर जाऊन शेतकऱ्यांना खेटे मारावे लागतात. शेतकऱ्यांना हा त्रास विनाकारण सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व योजनांची माहिती देणे, विविध योजनेचे फॉर्म भरणे यासाठी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी शिवसेना कार्यालयातच “शिवम मल्टीसर्विसेस” या दुकानाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातच सुविधा देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.गावातील जनतेस निलंग्याला जाऊन पैसा व वेळ खर्च करण्याऐवजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या गावामध्ये सर्व सुविधा शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना शाखेत “शिवम मल्टीसर्विसेस ” या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, मुख्याध्यापक संजय लादे, मनोहर फुलारी, अभय मिरगाळे , चंद्रकांत स्वामी, दयानंद स्वामी,उद्धव जाधव,बालाजी नारायणपुरे,विलास माळी, व्यंकट पाटील, सागर कोरके, राम लादे, सतिश लादे, राजकुमार तांबाळे, सुजीत मिरगाळे, लक्ष्मण नारायणपुरे, अभिजित टोपान्ना, दत्ता मिरगाळे,सचिन गिरी , नितिन गिरी, श्रिधर गिरी,कैलास गिरी, दत्ता गंभीरे,विक्रम टाकेकर, महादेव सुर्यवंशी,धम्मदीप कांबळे, व्यंकट कांबळे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते..