न्यायाची भीती बाळगू नका जिल्हा व सत्र न्यायाधीश संभाजीराव ठाकरे
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या काळात ऑनलाइन मध्ये मुलांनी शिक्षण घेण्याऐवजी मोबाईल गेमकडे, विनाकारण मुलींना एस.एम.एस पाठवू नये असे आणि इतर आगाऊ कामाकडे वळल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तो गुन्हा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन घडवायचे असेल तर वाचन, चिंतन, मनन, व्यायाम, प्राणायाम, ध्यान योगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी न्यायाची भीती अजिबात बाळगू नका असे जाहीर आवाहन केले.
ते यशवंत विद्यालयात आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने बालकासाठी कायदे विषयक जनजागृती शिबिरात मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश प्रसाद सवदीकर, दिवानी न्यायाधीश शामराव तोंडचीरे, दिवानी न्यायाधीश अतुल उत्पात, विशेष उपस्थिती टागोर शिक्षण समितीचे सचिव डी. बी. लोहारे गुरुजी, वकील संघाचे सदस्य एडवोकेट वीरेश उट्टे, मुख्याध्यापक व्ही.व्ही. गंपले सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश संभाजीराव ठाकरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये अभ्यासासोबत शरीरस्वास्थ्य, इंग्रजी विषयाकडे, स्पर्धा परीक्षेकडे, न्याय्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे जाहीर आवाहन केले. यावेळी दिवानी न्यायाधीश अतुल उत्पात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी म्हणाले की कायद्याचा अभ्यास करा, गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळू नका, शालेय जीवनात सकारात्मक वागा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेश उप्पे यांनी, सूत्र संचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचा शुभारंभ संविधानाच्या वाचनाने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने ग्रंथ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, विभाग प्रमुख के. डी. बिरादार, बालाजी सोनटक्के, महादेव खळूरे, सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कायदेविषयक शिबिराचा समारोप राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या न्याय गीताने करण्यात आला.