इनर विल आणि न्यू शॉपिंग सेंटरच्या नवदुर्गा चा विधायक उपक्रम
आजारा पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे
डॉ .अर्चना ताई शिंदे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगामध्ये माणसाचे जीवन स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगून निरामय जीवन जगण्यासाठी प्राणायाम, ध्यान, योग करा. बदललेल्या जीवनशैलीमध्ये पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध भूल तज्ञ डॉ. अर्चना शिंदे यांनी केले. त्या न्यू शॉपिंग सेंटर येथे इनरव्हील क्लब आणि न्यू शॉपिंग सेंटर च्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरीर स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा भोसले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ .संगमेश्वर हेंगणे, डॉ. अमृत चिवडे, डॉ. मनकर्णा पाटील, योग मूर्ती शिवमुर्ती भातंबरे ,डॉ. रत्नमाला हिंगणे .डॉ. जीवन शिंदे. दक्षयानी महिला मंडळाच्या अध्यक्षा माहेश्वरी शेटकार सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अर्चना शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की जीवनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आज सगळीकडे यांत्रिकीकरण झाले आहे त्यामुळे माणसाचे शारीरिक श्रम कमी झालेले असल्याने आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे जीवनाकडे सुखात दुःखात पण सकारात्मक दृष्टी ठेवून जीवन जगा असे आवाहन केले.
यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या सचिव विजया भुसारे यांनी सुत्रसंचलन आशा रोडगे यांनी तर आभार रामलिंग तत्तापुरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लब च्या सदस्या आणि न्यू शॉपिंग सेंटरच्या दुर्गादेवीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप देवीच्या गीताने करण्यात आला.