दौंड शहरात पोलिसांच्या घरावर दरोडा; सर्वसामान्यांचे काय?

दौंड शहरात पोलिसांच्या घरावर दरोडा; सर्वसामान्यांचे काय?

दौंड (सनी पगी) : शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून दौंड पोलिस ठाण्याचे नाईक अण्णासाहेब देशमुख यांच्यावर त्यांच्याच घरात वार करण्यात आले. दरोडेखोरांनी तीन घरांवर दरोडे टाकून दोन ठिकाणी घरफोडी केली असून अन्य ठिकाणी चोरीचा प्रयत्न केलेला आहे. शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबडून नेण्यात आले.

दौंड शहरात १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दाट लोकवस्तीच्या भागात हे दरोडे टाकण्यात आले. दौंड – गोपाळवाडी रस्त्यालगत भवानीनगर येथे दौंड पोलिस ठाण्यात कार्यरत अण्णासाहेब देशमुख यांच्या बंगल्यात दरोडेखोरांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लोखंडी व लाकडी दार उचकटून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी अण्णासाहेब देशमुख यांच्या ओठांवर व दातांवर धारदार शस्त्राने वार करण्यासह पाठीवर रॅाडने मारून त्यांना जखमी केले. शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातले दागिने, मुलांच्या पायातील चांदीच्या वाळ्या हिसकावून घेत कपाट व पाकिटातील रोख सत्तर हजार रूपये काढून दरोडेखोर निघून गेले. अण्णासाहेब देशमुख यांना ओठ आणि दाताखालच्या भागात एकूण दहा टाके पडले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गजानन सोसायटी येथील कमल सुरेश तुपेकर यांच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री दोन वाजता दाखल होऊन दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबडून काढले. त्याचबरोबर पर्स मधील रोख सहा हजार रूपये व चांदीचे पैंजण नेले. दरोडेखोरांनी कमल तुपेकर व वनिता सुरेश तुपेकर यांचे तोंड दाबले होते. तोंड दाबताच वनिता तुपकेर यांनी प्रतिकार केला व त्या दरम्यान विजेचा दिवा बंद झाल्याने दरोडेखोर पळून गेले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान सरपंच वस्ती शेजारील ढमे वस्ती येथे किशोर दत्तात्रेय ढमे यांच्या बंगल्यात स्वयंपाकगृहाचे दार उचकटून दरोडेखोरांनी प्रवेश केला. सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने व रोख साडेसहा हजार रूपये घेऊन दरोडेखोर निघून गेले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!