बिटरगाव ठाणेदारांची अवैध धंद्यांवर करडी नजर
यवतमाळ (राम जाधव):-जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निसर्ग वैभव लाभलेल्या जंगलव्याप्त भागातील ब्रिटीशकालीन पोलीस स्टेशन असलेल्या बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून प्रताप भोस यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये चालत असलेल्या दारू मटका जुगार अशा अवैध धंद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धाडसत्र राबवून नव्या ठाणेदारांनी अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली आहे .
बिटरगांव पोलीस स्टेशन हददीत निसर्ग सौंदर्याचा भरभरून खजिना असलेल्या पैनगंगा अभयारण्यात सहस्त्रकुंड धबधबा प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे . त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या परिसरात दुरवरून लोक येत असतात . मात्र बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू , मटका, जुगार, हातभट्टी दारू असे अवैध धंदे असल्याने परिसराची शांतता भंग होत असल्याचे निदर्शनास येताच नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार प्रताप भोस यांनी पोलीस उपनिरिक्षक कपिल मस्के यांच्या सहकार्याने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कामी लाऊन या अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिम राबविली आहे . त्यामुळे सद्यस्थितीत वर्दीचा धाक निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे . नवनियुक्त ठाणेदार प्रताप भोस यांच्या कामगीरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.