श्यामलाल हायस्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर व दिवाळी महोत्सव कलात्मक वस्तू प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न !

श्यामलाल हायस्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर व दिवाळी महोत्सव कलात्मक वस्तू प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न !

उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूलमध्ये आजादी का अमृत महोत्सव पॅन इंडिया अवेअरनेस अँडआऊट रीच प्रोग्रॅम तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय सर्वांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर दिनांक 21 ऑक्टोबर 2021रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आर. बी.राऊत साहेब तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उदगीर हे होते, प्रमुख उपस्थिती म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍड. सुपोषपाणि जी आर्य सर तसेच श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती अंजूमनी ताई आर्य उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी उदगीर तालुका विधीज्ञ सेवा संघाचे ॲड. श्री राजकुमार नावंदर सर, PLV member श्रीमती पारसेवार नीलिमा मॅडम, श्रीमती प्रतिक्षा चौधरी मॅडम, दासखेडकर मॅडम, श्री सय्यद सर इत्यादी उदगीर तालुका विधी संघाचे सदस्य उपस्थित होते. कायदेविषयक जाणीव जागृती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट श्री राजकुमार नावंदर सर यांनी केले. कायदेविषयक जाणीव जागृती व बाल न्याय मंडळ या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन न्यायाधीश श्री आर. बी.राऊत साहेब यांनी केले त्याचबरोबर श्रीमती पारसेवार नीलिमा मॅडम यांनीही किशोरवयीन मुलींच्या संदर्भातील अडचणी व त्यांना कायदे संदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन केले. या कार्यक्रमाचे आभार ॲड.दासखेडकर मॅडम यांनी केले
त्याच बरोबर दिवाळी महोत्सव व कलात्मक वस्तू प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष ॲड. सुपोषपाणि जी आर्य सर यांनी फीत कापून तर दीप प्रज्वलन करून संस्था सहसचिव श्रीमती अंजूमनी ताई आर्य यांनी केले. दिवाळी महोत्सव कलात्मक वस्तू प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने निर्मित केलेल्या विविध आकर्षक वस्तू,आकाश कंदील,पणती,ग्रीटिंग कार्ड, पाककलेतील विविध पदार्थ इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी श्री चव्हाण बालाजी सर, श्री राहुल लिमये सर, श्री बागडे सुनील सर, श्रीमती मुक्कावार मॅडम, श्रीमती तोलणवार मॅडम, श्रीमती होंन्ना मॅडम, श्रीमती रायवाड मॅडम, श्रीमती रोडगे मॅडम, श्रीमती रणमले मॅडम, श्रीमती मंदे मॅडम,श्री बोळेगावे दिनेश, श्री शेख सईद, श्री सोनाळे बालाजी, श्री हक्के नामदेव, श्री उमाकांत सूर्यवंशी इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. याप्रसंगी एनसीसी च्या विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष ॲड.सुपोषपाणि जी आर्य सर, संस्था सहसचिव श्रीमती अंजू मनीताई आर्य, श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

About The Author