श्यामार्य कन्या विद्यालयात दिवाळी महोत्सव अंतर्गत कलात्मक वस्तू प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न

श्यामार्य कन्या विद्यालयात दिवाळी महोत्सव अंतर्गत कलात्मक वस्तू प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : श्यामार्य कन्या विद्यालयात दिवाळी महोत्सव अंतर्गत कलात्मक वस्तू प्रदर्शन, उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुपोषपानि आर्य ,सहसचिव अंजुमनीताई आर्य ,श्यामलाल स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे व आयोजक श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते उपस्थित होते .
दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दिवाळी महोत्सवांतर्गत आकाश कंदील, दीप सजावट, रांगोळी, वॉलपीस, ग्रीटिंग कार्ड आणि पालकांसाठी पाककला स्पर्धा ठेवण्यात आलेली होती .या स्पर्धेत वर्ग पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थिनी खूप मोठ्या संख्येने सहभागी होत्या. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील असते असे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य यांनी मनोगतातून व्यक्त केले.

covid-19 च्या महामारी मध्ये दोन वर्ष शाळेमार्फत कलागुणांना वाव देण्यासाठी खंड पडलेला होता . दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज दिवाळी महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत . या निमित्ताने सर्व पालकांशी संवाद साधण्यासाठी एक दुवा निर्माण झाला आहे ,असे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
कला शिक्षणाचा मूळ हेतू मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला नीट वळण लावणे, लहान मुलाच्‍या मनात दडून बसलेल्‍या भाव भावना, सुप्‍त निर्माणक्षम शक्‍ती यांना वाव देवून त्‍यांच्‍या व्‍यक्त्मित्‍त्‍वाचा विकास करणे. हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. हे मानावेच लागेल,असे प्रास्ताविका मधून श्री आनंद हुरदळे यांनी आपले मत व्यक्त केले. परमेश्‍वराने प्रत्‍येक व्‍यक्तिमध्‍ये कलेचा अंश ठेवलेला आहे. त्‍याचे स्‍वरूप वेगवेगळे असू शकते. परंतू तो अंश आपल्‍यात आहे. हे ओळखण्‍याचे व त्‍याच्‍या अविष्‍काराचा प्रयत्‍न करणे म्‍हणजे कलेची उपासणा करणे. कोणत्‍याही ऐहिक सुखापेक्षा कलेतून मिळणारा आनंद निश्चित उच्‍च प्रतीचा असतो, असे कला विभाग प्रमुख श्री विजय बेले यांनी आपले मत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे व आभार प्रदीप येरोळकर यांनी मांडले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाना भाई चोपडे ,भगवान गिर, संजय पाटील, राहुल गुरमे, विकास जमादार आणि सर्व महिला शिक्षकांनी प्रयत्न केले .

About The Author