अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा खुन – आ. कराड

अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा खुन - आ. कराड

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांनी व स्‍वतःला सहकार महर्षी म्‍हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांनी भाजपासह सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद करण्‍याचे षडयंत्र रचून लोकशाहीचा खुन केला आहे असा आरोप करून हुकूमशाही पध्‍दतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची परवानगी मिळावी यासाठी राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल आणि केंद्रीय सहकारमंत्री मा. अमित शहा यांची भेट घेणार आहोत अशी माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूकीसाठी गेल्‍या ११ ते १८ ऑक्‍टोबर दरम्‍यान उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात आले. या अर्जाची २० ऑक्‍टोबर रोजी छाननी होवून भाजपासह सर्व विरोधी उमेदवारांचे सहकार बोर्डाच्‍या बेबाकीसह इतर किरकोळ कारणावरून अर्ज बाद करण्‍याचे कटकारस्‍थान अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांनी केले असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, बँकेत तुमचे चांगले काम होते तर लोकशाही पध्‍दतीने निवडणूकीला सामोरे जायला हवे होते मात्र तसे घडले नाही.

बँकेच्‍या संचालक मंडळ निवडणुकीच्‍या सर्व जागा लढण्‍याची पुर्णपणे तयारी आम्‍ही केली होती. बँक आमच्‍या ताब्‍यात येणार होती याची कुणकूण लागल्‍याने सर्व विरोधकाचे अर्ज बाद करण्‍यात आले. हिम्‍मत असेल तर निवडणुक होवू द्या. मतदाराने दिलेला कौल आम्‍हाला मान्‍य असेल पण निवडणुक टाळून मतदारांच्‍या अधिकारावर का गधा आणता असा सवाल आ. रमेशअप्‍पा कराड यांनी उपस्थित केला.

बँकेची निवडणूक होवू द्यायची नाही. यासाठी विरोधी उमेदवारांना सोसायटी व इतर सर्व कागदपत्रे उपलब्‍ध होण्‍यास अडचणी निर्माण केल्‍या गेल्‍या असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, २० ऑक्‍टोबर रोजी छाननीच्‍या वेळी अनेक अडचणीवर मात करून मिळविलेले बेबाकी प्रमाणपत्र दाखल करून घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे विरोधकांचे अर्ज बाद ठरविण्‍याची बेकायदेशिर प्रक्रिया सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावाखाली अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे.

सत्‍ताधारी पॅनचे उमेदवार धिरज देशमुख, बाबासाहेब पाटील, गोविंद बोपनीकर यांच्‍यावर विरोधकाकडून गंभीर स्‍वरूपाचे आक्षेप छाननीच्‍या वेळी घेतले. त्‍यावर कुठलीही चर्चा न होता विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावण्‍यात आले. २२ ऑक्‍टोबर दुपारी ५ पर्यंत अर्ज बाद केल्‍याची कारणे लेखी स्‍वरूपात उमेदवारांना प्रशासनाने दिली नाहीत. जर ही माहिती उद्या मिळाली तर शनिवार रविवारच्‍या सुट्या असल्‍याने उपविभागीय सहनिबंधकाकडे ३ दिवसाच्‍या आत अपिल करावे लागते. ते अपिल करता येवू नये अशी व्‍युहरचना सत्‍ताधाऱ्यांनी केली असल्‍याचा आरोपही आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केला आहे.

आठ दिवस दिवाळीमुळे न्‍यायालय बंद राहणार असल्‍याने नेमकी दाद मागता येणार नाही त्‍यामुळे या निवडणूक प्रक्रियेची सविस्‍तर माहिती राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल मा. भगतसिंहजी कोशारी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना देवून सत्‍ताधाऱ्यांच्‍या हातचे भाऊले बनून लोकशाहीचा खुन करणाऱ्या अधिकाऱ्यां विरूध्‍द फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी करणार आहोत अशी माहितीही भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी यावेळी बोलताना दिली.

या पत्रकार परिषदेस भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, भगवानराव पाटील तळेगावकर, किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, गंगापूरचे सरपंच बाबु खंदाडे यांच्‍यासह अनेकजण होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!