दृष्टिहिन विद्यार्थाना जगण्याची उर्जा देण्याचे कार्य उदयगीरी नेत्र रूग्णालय व अंध शाळा करत आहे – देवशटवार

दृष्टिहिन विद्यार्थाना जगण्याची उर्जा देण्याचे कार्य उदयगीरी नेत्र रूग्णालय व अंध शाळा करत आहे - देवशटवार

उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून आधीच दूर असलेल्या समाजातील अंध मुला-मुलींचे आयुष्य कसे असेल,याची सहज कल्पना करता येऊ शकते.

पण उदयगीरी बाबाच्या नगरीत प्रकाशाची वाट दाखवणारे अरूणा अभय ओसवाल रिसर्च सेंटर व उदयगीरी नेत्र रूग्णालय या परीसरातील अंध विद्यार्थ्यासाठी निवासी अंध विद्यालयाच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना जगण्याची उमेद मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही संस्था दृष्टिहीन,कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा सर्व ‘दिव्यांगां’साठी समर्पित भावनेने कार्य करीत आहे.

या अंध मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मरावठवाड्यातील ही एकमेश शाळा निवासी शाळा सुरू आहे.या शाळेला शासनाची मदत नाही,तरीही सामाजिक बांधिलकी बाळगुन शाळा सुरू आहे, खरोखर ही बाब कौतुकास्पद आहे असे देवशटवार म्हणाले.

जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यशाळेचे आयोजन दि.27 व 28 ऑक्टोबर वार बुधवार,गुरवार रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अविनाश देवशटवार विभागीय उपआयुक्त समाज कल्यान लातुर,हे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॅ.रामप्रसाद लखोटिया,अध्यक्ष उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उमाकांत वडीले ,रमेशअण्णा अंबरखाने,महेश बसपुरे,सुरेश देबडवार,अरविंद कोटलवार,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक

विश्वनाथ मुडपे, हे होते.

या कार्यक्रमाचे उदघाटण दिप प्रज्वलण करूण झाले. उपस्थीत माण्यवरांचे स्वागत अंध शाळेतील विद्यार्थी यांनी स्वागत गित गाऊन केले.उपस्थीत माण्यवरांचा सत्कार उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय उदगीर यांच्या वतिने करण्यात आला.उपस्थीत माण्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात अंध मुलाना पांढरी काटी व जिव्हाळा ग्रुपच्या वतिने अंध मुलांना टावेल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांत गायकवाड यांनी केली तर

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व अभार प्रा.गौरव जवळीकर यांनी केले.

About The Author