दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ सुनीता सांगोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी असे प्रतिपादन केले की, “लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले.स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.

पुढे ते म्हणाले की, “इंदिरा गांधी यांनी स्वांतंत्र्य चळवळीत लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली “वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली. २४ जानेवारी १९६६ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी विराजमान झाल्या. श्रीमती इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, बांगलादेशाची निर्मिती,ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटना ठरल्या.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी,प्रा संजय कुलकर्णी, डॉ प्रशांत दीक्षित, डॉ संदीपान जगदाळे,प्रा सुधीर गाडवे,डॉ यवराज सारणीकर, रामकिसन शिंदे व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते .

About The Author