आत्मविश्वासाने प्रेरीत होऊन काम करणारा सेवानिवृत्तच होत नाही – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : गावचा ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी पदापर्यंतचा प्रवास करणार्या भागवतराव भिसे यांनी ग्रामस्थांची मर्जी सांभाळून आतापर्यंत चांगले काम केलेले आहे.या कामाच्या माध्यमातून अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण झालेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही ते असेच सक्रियपणे काम करीत राहतील, काम करणारा माणूस सेवानिवृत्तीनंतरही आत्मविश्वासाने प्रेरीत होऊन काम करतो त्यामुळे त्यांची सेवानिवृत्तीच होत नाही तो कायम सेवेतच राहतो. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ते विस्तार अधिकारी (कृषी)भागवतराव भिसे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रूक्मिनी मंगल कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला अखील भारतीय वारकरी महामंडळ,पुणे विभागाचे अध्यक्ष ह.भ.प.नामदेव महाराज चव्हाण आळंदी (दे), बीड जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, मारोती महाराज साखर कारखाना बेलकूंडचे व्हा.चेअरमन शाम भोसले, लातूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.आर.चोले, गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, रा.ग्रा.स्व.अभियान पुणेचे राज्याचे प्रभारी उपसंचालक शाम पटवारी, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले, शिरूर अनंतपाळ पं.स.चे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, भागवतराव भिसे, लक्ष्मीबाई भागवतराव भिसे, ग्रामसेवक संघटना लातूरचे अध्यक्ष विष्णू भिसे, दत्तात्रय भिसे, तुकाराम भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मॅडम असताना लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. त्यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. म्हणून जगदाळे हे अधिकारी होते. त्यांनीही खूप सहकार्य केले. त्यामुळे लातूर जिल्हा परिषद ही देशात पहिली आली असून या जिल्हा परिषदेला 50 लाखाचे पारितोषिक मिळाले ही आपल्या दृष्टिने आनंदाची बाब आहे. जो माणूस आत्मविश्वासाने काम करतो. त्याची सेवानिवृत्ती होत नाही. राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचे सर्सेसर्वा शदरचंद्रजी पवार यांची वयाची 85 वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच लालकृष्ण अडवाणी यांची वयाची 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही ते त्याच आत्मविश्वासाने राजकारणात सक्रियपणे काम करतात. त्यामुळे आपणही यापुढील कालावधीत आत्मविश्वासाने कामे करावीत आणि पुढील सामाजिक कार्यात सक्रिय रहावे, असे आवाहनही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विस्तार अधिकारी भागतवराव भिसे व लक्ष्मीबाई भागवतराव भिसे यांचा सहकुटुंब सत्कार भाजपा नेते तथा किसान मोर्चाचे गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत सुर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमाला धनंजय भिसे, भागवत भिसे, किसनराव लोमटे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.