युवासेनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात सायकल रॅलीचे आयोजन
निलंगा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ केल्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबाचे आर्थिकचक्र बिघडले आहे. आतापर्यंतच्या काळामध्ये या सरकारने पेट्रोल, डिझेलने शंभरच्यावर आकडा पार केला आहे. त्याविरोधात युवासेनेच्या वतीने राज्यव्यापी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करावा असा आदेश युवासेनाप्रमुख तथा पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनी केले होते. त्यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सायकल रॅलीचे निलंगा येथे युवासेनेच्या वतीने आयोजन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, महिला जिल्हासंघटक डॉ.शोभाताई बेंजरगे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवासेना जिल्हाप्रमुख राहुलजी मातोळकर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत वाजरवाडे, व्यापारी आघाडी तालुकासंघटक प्रसाद मठपती, शुभम डांगे, आशिष सुरवसे, बलवान कांबळे ,अजय कांबळे, प्रशांत पवार, जगदीश पाटील, कीशोर स्वामी, सोनू वाघमोडे, अजय वावरे, सतीश धायगुडे, सचिन रुपनर इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.