गेले ते कावळे राहिले ते मावळे निवृत्ती साळवे

गेले ते कावळे राहिले ते मावळे निवृत्ती साळवे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगिरी नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एम आय एम च्या पाच नगरसेवकांना भूल घालून आकर्षित केले आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायला लावला एम आय एम चे पाच नगरसेवक गेल्याने एम आय एम ची शक्ती कमी झाली नाही त्या पाच नगरसेवक मुळे पक्ष नव्हता तर पक्षामुळे ते होते हे त्यांच्या लक्षात आले नाही उलट त्या लोकांच्या जाण्याने एम आय एम ची प्रतिमा आणखीच उजळून निघाली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष कथा एमआयएमचे नगरसेवक निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि एम आय एम यांनी गेल्या निवडणुकीत आघाडी करून चांगली लढत देत सहा नगरसेवक निवडून आणले होते यावेळेस एमआयएमची शक्ती आणखीच वाढली असून राष्ट्रीय दलित अधिकार मंचची साथ त्यांना मिळाल्यामुळे या निवडणुकीत एम आय एम आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या आघाडीला भरपूर यश मिळेल असाही विश्वास निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी व्यक्त केला आहे एम आय एम चे नेते बॅरिस्टर असोदिन ओवेसी हे समाजामधील एक लोकमान्य लोकनेते आहेत त्यामुळे अशा आयाराम आणि दयाराम मुळे राष्ट्रवादीची प्रतिमा कधीच वाढणार नाही उलट एम आय एम च्या या नगरसेवकांना प्रलोभन देऊन पक्षात घेतले असेल चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाली आहे तर असे स्वार्थी प्रवृत्तीचे नगरसेवक एम आय एम मधून गेल्यामुळे एम आय एम ची प्रतिमा उंचावली आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निश्चितपणे राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि एम आय एम च्या बाजूने असेल निवडणुकांच्या पूर्वसंध्येला अशा पक्षांतर मुळे कोणत्याही पक्षाचा जनाधार अजिबात वाढत नाही असा विश्वास निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी व्यक्त केला हे आयाराम गयाराम म्हणजे पावसाळी बेडकासारखे असतात ते कधी कुठून कुठे उडी मारतील याचा भरवसा नसतो या अशा दलबदलू ना जनता निश्चित जागा दाखवेल संधीसाधूपणा मुळे पक्षांतर करण्याचा खेळ जनता ओळखून असते परिणामतः जनते ला अशा दलबदल ऊंचा कोणताही विश्वास राहत नाही राष्ट्रीय दलित अधिकार मंच चे प्रमुख आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली असली तरीही स्थानिक पातळीवर अद्याप काँग्रेससोबत आघाडी झालेली नाही भविष्य योग्य पद्धतीने वाटाघाटी झाल्या तर आघाडीचा आम्ही विचार करू अशी ही शक्यता याप्रसंगी निवृत्तीराव सांगळे सोनकांबळे यांनी व्यक्त केले एकंदरीत उदगीर नगरपालिकेचे राजकारण हळूहळू तापू लागले आहे निवडणुका जसजशा जवळ येतील तशा तशा आघाड्या आणि एक दुसऱ्याला पाठिंबा देण्याचे नाट्य रंगत जाईल अशी शक्यता आहे.

About The Author