डॉ. तेलगाणे यांच्या ओम हॉस्पिटल येथे लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ शरद कुमार तेलगाणे यांच्या ओम हॉस्पिटल प्रसूती व शस्त्रक्रिया गृह येथे मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात जनतेने प्रतिसाद मिळाला.याबद्दल उदगीर येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी डॉ. शरद कुमार तेलगाने यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही लसीकरण करून घेतले नाही, त्यांनी सामाजिक जाणीवा जपण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. गोविंदराव सोनकांबळे,डाॅ. दत्तात्रय पाटील, डॉ बाळासाहेब पाटील, डॉ. ज्योती मोगले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी राबवलेल्या उत्कृष्ट मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.