समर्पण च्या कृष्णा लोणे ला बायोलॉजी मध्ये 360 पैकी तब्बल 350 गुण.

समर्पण च्या कृष्णा लोणे ला बायोलॉजी मध्ये 360 पैकी तब्बल 350 गुण.

उदगीर ( प्रतिनिधी ) : विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आत्मविश्वास व अथक परिश्रमाचे बीज पेरनाऱ्या समर्पण करिअर इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच बोर्ड, एमएच-सीईटी, जेईई व नीट परीक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले असून, या वर्षीच्या राष्ट्रीय पातळीवरील नीट परीक्षेतील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये समर्पण च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट-2021 मध्ये समर्पण करिअर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात गगनभरारी घेतली आहे. यामध्ये कृष्णा गोविंदराव लोणे 360 पैकी तब्बल 350 गुण मिळवीत देशातील बायलॉजी विषयातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त करून, समर्पण मधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कुंटे अजय पुनीलाल याने 330 गुण, ज्ञानेश्वरी तुकाराम राखोंडे 315 गुण, अंजली तानाजी जाधव 315, सुरज विठ्ठल करडाळे 312 गुण तर मलिशे लक्ष्‍मी गोविंद 305 गुण मिळवत गरुड झेप घेतली आहे. केमिस्ट्री विषयात कुंटे अजय याने 97.29% पर्सेंटाइल मिळवित सर्वप्रथम, ज्ञानेश्वरी राखोंडे 90.16% पर्सेंटाइल मिळवीत द्वितीय तर सुरज करडाळे 88.09% पर्सेंटाइल मिळवीत समर्पण मधून तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. फिजिक्स मध्ये 97.02% मिळवित कुंटे अजय याने बाजी मारली आहे. समर्पण च्या दुसऱ्याच वर्षाच्या सात विद्यार्थ्याच्या बॅच ने समर्पणची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे हे या निकालाच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.

समर्पन चे संचालक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार डॉ. एपीजे अब्दुल कलाम युथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त प्रा. अविनाश प्रभूराव पाटील, संचालक सुनिल यशवंतराव ढगे, व्यवस्थापकीय संचालक विकास प्रभूराव पाटील यांनी या गुणवंतांचे अभिनंदन केले. या यशासाठी समर्पण एक्स्पर्ट टीम प्रा. अक्षय मुंगळे, प्रा. अशोक कदम, प्रा. दीपक बिरादार, प्रा. ओमकार शिंदे, प्रा. प्रांजली पटारे, प्रा. नागनाथ खरात, प्रा. गणेश कदम, प्रा. राधाकिशन जाधव, प्रा. कृष्णा जायभाये यांनी परिश्रम घेतले आहे. या निकालाचं उदगीर शहर आणि परिसरातील सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे.

About The Author