लातूरचा विजय घोलपे मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत प्रथम

लातूरचा विजय घोलपे मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत प्रथम

 लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर येथील कलाकार विजय घोलपे याने नील ग्रुप ऑफ कंपणीज यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रन नेक्स्ट स्टार आयकॉन 2021 या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत लातूरचे नाव लौकिक केले आहे. नील ग्रुप आॅफ कंपनीज यांनी लहान मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी, युवकांसाठी, मुलींसाठी व विवाहित महिलांसाठी वेगवेगळे गट बनवून महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून कलाकारांनी भाग घेतला होता.

 मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन या स्पर्धेसाठी तीस कलाकारांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी चौघांची निवड झाली होती त्यातून लातूरचा विजय घोलपे याने प्रथम क्रमांक पटकावत नावलौकिक मिळवले आहे. विजय घोलपे यांनी मिस्टर बेस्ट स्टाईल हे देखील पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कला क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

 फॅशन शो सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये लातूरच्या कलाकाराने भाग घेऊन लातूरचे नाव लौकिक केले आहे. लातूरच्या कला क्षेत्राची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या यशाबद्दल अभिजीत संकाये पाटील, निल कांबळे पाटील, सौ हर्षा शर्मा यांनी आणि इतर मार्गदर्शक आणि सहकार्य केल्याची प्रतिक्रिया विजय घोलपे यांनी व्यक्त केली आहे.

About The Author