द्वारकादास श्यामकुमार ग्रुपकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षरोपे भेट

द्वारकादास श्यामकुमार ग्रुपकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षरोपे भेट

ग्रुपकडून दरवर्षी फुले महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून दत्तक घेऊन तुकाराम पाटील हे पालकत्त्व स्वीकारतात

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील द्वारकादास श्याम कुमार ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अहमदपूर शहरात मोलाची कामगिरी बजावत असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयास विविध प्रकारची दहा वृक्षरोपे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना भेट दिली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कापड उद्योगात अग्रगण्य असणारे द्वारकादास श्यामकुमार हे कापड दुकान फक्त व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून उद्योग क्षेत्रांमध्ये नावारूपास आले नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत या उद्योग समूहाने अल्पावधीत व्यावसायिक क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. या उद्योग समूहाचे प्रमुख तुकाराम पाटील हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील द्वारकादास श्यामकुमारचे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये हे मोलाचे कार्य केले आहे .
याचाच एक भाग म्हणजे शिवाजी सूर्यवंशी यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना विविध प्रकारची दहा वृक्षरोपे भेट दिली . यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी , डॉ. सतीश ससाणे, डॉ. नागराज मुळे, डॉ. अनिल मुंढे , डॉ. मारोती कसाब , डॉ. संतोष पाटील , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे द्वारकादास श्यामकुमार हा उद्योग समूह प्रत्येक वर्षी महात्मा फुले महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतात. या विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, शिक्षण घेण्याची इच्छा पाहून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे करतात. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या व उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व द्वारकादास श्यामकुमारचे मालक तुकाराम पाटील यांच्या दातृत्त्व वृत्तीमुळे यांच्या सहकार्यातून व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर च्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय ‘ या बोधवाक्याने प्रेरित होऊन अहमदपूर सारख्या ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून शिक्षणापासून दूर असणाऱ्या समुहा पर्यंत उच्च शिक्षण पोहचवण्याचे कार्य करतात. द्वारकादास श्यामकुमारचे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी हे करीत असलेल्या सामाजिक कार्याचे व पर्यावरण संवर्धनाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

About The Author