प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना लोकसंवाद पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचा पुरस्कार अड.एल.जी .पुयड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच जाहीर केला. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी जि. नांदेड च्या वतीने मागील पंधरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकसंवाद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२१ या पुरस्काराचे मानकरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षणात ‘फुले पॅटर्न’ निर्माण करणारे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ , मराठीचे थोर साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना दि. ३१जानेवारी २०२१ रोजी सिंधी ता. उमरी येथे होत असलेल्या १५व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते लोकसंवाद पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, महावस्त्र व प्रशस्तीपत्र असे आहे,
विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना आजपर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा बहुमान महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य डॉ.डी. डी. चौधरी यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल मुंडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले . यावेळी डॉ. नागराज मुळे, डॉ. सतीश ससाने, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. ए .एस. मोरे ,डॉ. संतोष पाटील, डॉ. बब्रुवान मोरे ,डॉ. पी. पी. चौकटे, प्रा.ए.सी .आकडे, डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे, कार्यालय अधीक्षक प्रशांत डोंगळीकर ,अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.