अहमदपूर नगर परिषदेच्या व्यापारी संकुल बांधकामाचा शुभारंभ
शहरातील शासकीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील शासकीय कार्यालयांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले शहरातील नगर परिषदेच्या आरक्षण क्रं ३८ (ब) जागेवर मुन्फ्रा योजनेंतर्गत व्यापारी संकुल बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. (१८ जानेवारी) यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.अश्विनी लक्ष्मीकांत कासनाळे होत्या यावेळी मंचावर मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, जि.प.सदस्य माधव जाधव, शिवाजीराव देशमुख ,तुकाराम पाटील, दिलीप जाधव, शिवाजी खांडेकर, नगरसेवक डॉ.फुजैल जहागीरदार, अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, रवी महाजन, संदीप चौधरी, शेखर चौधरी, अभिजीत माने, जावेद बागवान, सय्यद मुन्ना, सय्यद लाल सरवर, सुनील डावरे, अझर बागवान, दयानंद पाटील, प्रशांत भोसले, आशिष तोगरे,अशोक सोनकांबळे, हुसेन मणीयार, वसंत शेटकर, बांधकाम अभियंता हावगीराज ढोबळे यांची उपस्थिती होती.
मुन्फ्रा योजना अंतर्गत दहा कोटी रूपयांचे तळ मजल्यावर 54 , पहिला मजला 58,दुसरा मजला 34 असे एकूण 146 गाळे होणार आहेत.या कामामुळे व्यापा-यांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की,शहराला व्यापारी संकुलाची नितांत गरज होती.शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामासाठी कुठलेही राजकारण न आणता पक्ष बाजूला सोडून आमदार हा सर्व जनतेसाठी असतो असेही सांगताना बाबासाहेब पाटील म्हणाले विकासाची गंगा अमदपुर मध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम असेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ.अश्विनी कासनाळे यांनी शहरातील विकास कामाचा लेखाजोगा मांडला.अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत ती पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. शिध्दार्थकुमार सुर्यवंशी यानी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील व आभार अॅड अमित रेड्डी यांनी मानले.