पालकमंत्र्यांच्या हस्ते निराधारांना मंजुरी पत्रांचे वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते निराधारांना मंजुरी पत्रांचे वाटप

लातूर ग्रामीण ‘संगांयो’ समितीच्या कार्याचेही केले कौतुक

लातूर (प्रतिनिधी) : अबाल, वृद्ध, निराधारांना शासनाची मदत घरपोच मिळावी, अशी भूमिका राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेऊन तशा सूचना लातूर ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीला केल्या. त्यानुसार ‘संगांयो’ समितीने गावोगावी भेटी देऊन ‘संगांयो-इंगांयो’ योजनेसाठी पात्र निराधारांची सर्व अर्ज प्रक्रिया गावातच करुन अर्ज दाखल करुन घेतले. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देण्यात येणा-या मंजुरी पत्राचे वाटप लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील बोरी येथे पात्र निराधारांना करण्यात आले.

सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणची संगांयो समिती लातूर तालुक्यातील निराधारांसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. अधिकाधिक निराधारांना योजनेत सहभागी होता यावे, यासाठी समितीने पालकमंत्र्यांना केलेल्या विनंतीमुळे वयाच्या पुराव्यासंबंधी अट शिथिल करण्यात आली. तसेच पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार कोरोनाचा वाढता प्रभाव असलेल्या काळात लातूर ग्रामीण संगांयो समितीने गावोगावी सुसंवाद बैठका घेऊन निराधारांच्या शंकांचे निरसन केले व समाधान शिबीराच्या माध्यमातून कागदपत्रे व अर्जाची सर्व प्रक्रिया गावस्तरावर करुन घेतली व या प्रक्रियेचा भाग म्हणून पात्र निराधारांना योजनेचे मंजुरी पत्रही समितीच्या वतीने गावस्तरावरच दिले जात आहे. मंजुरी पत्राचे वितरण बोरी येथे पालकमंत्री अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते पात्र निराधारांना करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, ट्वेन्टीवन कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख, संगांयो समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके,दगडूसाहेब पडिले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य हरीश बोळंगे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर चे संचालक धनराज दाताळ, राजेसाहेब पाटील, सुनील पडिले, उपसरपंच शंकरराव पाटील, सचिन दाताळ,सतिष पाटील, व्यंकटराव पाटील, कमलाकर अनंतवाड, प्रशांत मलवाडे, बालाजी मनदुमले, ज्ञानोबा गवळे, बोगदाद सगरे, अरूण वीर,बंडु पाटील, ज्ञानोबा शेंडगे, लिंबराज पाटील, परमेश्वर पाटील, नानासाहेब पाटील, बालाजी वाघमारे, ज्ञानेश्वर दाताळ, सिद्धेश्वर स्वामी, चंद्रकांत बर्चे, राजेश खाडप, बब्रुवान मलवाडे, शालिक थोरमोटे, काकासाहेब पाटील, मधुकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, निराधार उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कोणताही निराधार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी लातूर ग्रामीण संगांयो समितीने लोकाभिमुख अशा जनजागृती व सुसंवाद बैठका व समाधान शिबीर यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निराधारांना दिलेल्या आधाराबद्दल प्रविण पाटील व लातूर ग्रामीण संगांयो समितीचे पालकमंत्री ना. अमितजी देशमुख यांनी यावेळी कौतुक केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!