दयानंद कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचालित, दयानंद कला महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने शुक्रवार २९ ऑक्टोबर २०२१रोजी हिंदी के बूते : रोजगार के रास्तें या विषयावर ऑनलाईन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटक म्हणून डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्र-कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड हे होते. वेबीनारचे स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात संस्था, महाविद्यालय व हिंदी विभाग याबद्दल कौतुकोद्गार काढले.
बीजभाषक म्हणून प्रो. अर्जुन चव्हाण, हिंदी आलोचक एवं साहित्यिक, छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे लाभले होते. ते आपल्या बीजभाषणात म्हणाले की, आज हिंदीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी माध्यमामध्ये खूप साऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उदा. उत्क्रष्ठ संवाद लेखक, उर्त्क्रष्ठ सुत्रसंचालक, गितकार, जाहिरातदार इत्यादी . आजचे युग हे प्रीन्ट मिडिया व वायर मिडीयाचे आहे. रिडियो व दूरदर्शनचे शेकडो चॅनल चालत आहेत. त्यामध्ये हिंदीच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत.
दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेशजी बियाणी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, आज बाजारातसुध्दा हिंदी बोलणाऱ्यांची गरज आहे. कारण जनसामान्यातसुध्दा आज हिंदी लोकप्रिय होत आहे. विविध हिंदी चॅनल मुळे लहान लहान मराठी भाषीक मुलेसुध्दा शुद्ध हिंदीचा उपयोग करीत आहेत. वर्गात शिकविल्या जाणाऱ्या हिंदीचा उपयोग बाजारात व जनसामान्यात सुध्दा झाला पाहिजे असा अग्रही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
चीन येथून बोलणारे प्रमुख वक्ते डॉ. विवेकमणी त्रिपाठी च्वांगतोंग वैदेशिक विश्वविद्यालय,चीन येथील सहाय्यक प्राध्यापक यांनी भारताबाहेर हिंदी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत यावर विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले आज चीनमध्ये सुध्दा हिंदी बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधल्या विविध विद्यापीठात हिंदीचे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. कारण चीन साठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हा चीनी माल भारतात खपविण्यासाठी हिंदी विद्यार्थ्यांची गरज आहे. अर्थात हिंदीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातच नाहीतर परदेशातसुध्दा खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत.
रशियातुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलणारे डॉ. रामेश्वर सिंग रुसी पत्रकार मास्को रुस यांनी सुध्दा हिंदी विद्यार्थ्यांसाठी रशियामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत यावर विस्तृत मार्गदर्शन केले. विशेषत: त्यांनी स्थापन केलेल्या “दिशा” या संस्थेच्या माध्यमातून हिंदी विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. कारण भारत आणि रशियामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशियातसूध्दा हिंदी बोलणाऱ्यांची संख्या सध्या खूप मोठया प्रमाणात वाढत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामेश्वर सिंह, रूसी पत्रकार, मास्को ,रूस , दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रमेशजी बियाणी , प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड हे लाभले होते. प्रमुख वक्ता म्हणून डॉ. विवेक मनी त्रीपाठी, सहा. प्रोफेसर,च्वांगतोंग वैदेशिक विश्वविद्यालय,चीन यांनी मार्गदर्शन केले. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या अध्यक्षस्थानी डॉ.शकुंतला सरुपरिया, विख्यात गीतकार, गजलकार, गायिका, उदयपुर, राजस्थान ह्या लाभल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बेबिनारचे संयोजक डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सुत्रसंचलन डॉ. गोपाल बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.विजय कांबळे यांनी केले. या वेबीनारच्या सफलतेसाठी डॉ. महारुद्र सिरसट, डॉ. मिना घुमे व विभागातील इतर सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. या वेबीनारला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सहकारी, हिंदी प्रेमी नागरीक व विद्यार्थी यांचा उत्सस्फूर्त प्रतिसाद होता.