शिवाजी महाविद्यालयास नांदेड विद्यापीठाच्या “उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण विभाग” 2021-22 चा पुरस्कार
लातूर (प्रतिनिधी) : विद्यापीठाच्यावतीने प्रतीवर्षाप्रमाणे याहीवर्षी गुणवत्तासुधार योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणार्या उत्कृष्ठ पुरस्कार 2021-22 साठी गठीत केलेल्या संमितीकडून जेएसपीएम शिक्षण संस्थेअंतर्गत चालविल्या जाणार्या रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयास नांदेड विद्यापीठातील उत्कृष्ठ महाविद्यालय ग्रामीण विभाग 2021-22 चा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला असून जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते प्राचार्य, उपप्राचार्य व शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील समस्त टीमचा यथोचित सत्कार करण्यात आला. नांदेड विद्यापीठाच्यावतीने शिवाजी महाविद्यालयाची पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील आदींनी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.अवस्थी, उपप्राचार्य मारूती सुर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.