केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावे – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्यावतीने देशातील जनतेला दिवाळीतच जनहिताचा निर्णय घेऊन जनतेला गिफ्ट दिलेली आहे. ऐन दिवाळीतच पेट्रोलचे दर 5 रूपयांची कमी तर डिझेजलचे दर 10 रूपयांनी कमी करून जनतेला आधार देण्याचे काम केलेले आहे. याची अंमलबजावणी राज्यातील 11 राज्याने केलेली आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये एक रूपयाही कमी केलेला नाही. परंतु जनसामान्यांचा विचार करून केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल-डिझेलचे भाव तत्काळ कमी करावेत अशी मागणी भाजपा नेते किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांन केली आहे.
तीन टप्प्यात झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघालेला आहे. याची दखल केंद्रातील मोदी सरकारने घेतली असून पेट्रोलचे दर पाच रूपयांनी व डिझेलचे दर 10 रूपयांनी कमी केलेले आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल 109.98 व डिझेल 94.14 वर आलेली आहे. कर्नाटक राज्यामध्ये पेट्रोलचा दर 101.28 रूपये तर डिझेल 85.67 रूपये, गोवा पेट्रोल 96.25 रूपये तर डिझेल 87.12, गुजरात पेेट्रोल 95.13 रूपये तर डिझेल 89.12 रूपयावर आलेले आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रानेही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अपेक्षीत होते. परंतु कमी केलेले नाही. त्यामुळे इतर राज्याच्या आदर्श घेऊन महाराष्ट्र शासनानेही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेत तसेच पेट्रोल डिझेल देशभरात जी.एस.डी. योजनेत आणण्याचा प्रस्ताव केंद्राने दिला होता. त्यास देशातील राज्याने पाठिंबा दिल्यास तेलाचे दर कमी होऊन देशभर सारखे दर राहतील. अन्यथा याचे दूरगामी परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असा इशाराही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिला.