काळ्या फिती लावून ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

काळ्या फिती लावून ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद येथील सरपंच परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल आक्षेपहार्य व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने लातूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी मंगळवार दि. 9 नोव्हेबर रोजी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले.

औरंगाबाद येथील सरपंच परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवक संवर्ग बद्दल आकस बुद्धीने व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे ग्रामसेवक बांधवांचा मानसन्मान व आत्मसन्मान दुखावला गेला आहे यामुळे जिल्हा कार्यकारणी आदेशान्वये लातूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आमदार संजय शिरसाट यांनी तमाम ग्रामसेवक बांधवांची जाहीर माफी मागावी यासाठी मंगळवारी लातूर पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना लातूर तालुकाध्यक्ष विष्णू भिसे, सचिव सुधीर थडकर, एस एन देशमुख, एस बी आदमाने, एस ए घाडगे, आर व्ही गायकवाड, डी सी कांबळे, एस ए धनेगावे पी व्ही रेडी, एस डी पटवारी, एस आय शेख, वाय व्ही लातूरकर, ए आर चौहान, एन यु माळी, एस आर ढावारे, एस पी कल्याणी, एम एस गुरमे, राहुल सुतार, ए बी निरुडे, आदी ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

About The Author