खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपामुळे बस बंद आहेत. त्यामुळे बाहेरगावी प्रवास करणाऱ्या लोकांना खाजगी वाहना शिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र या खाजगी वाहन चालकांनी आपली मनमानी चालवली असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट चालवली असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांनी उदगीर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचेही त्याने नमूद केले आहे.प्रवासी वहातुकीसाठी पुर्वी ज्या प्रमाणे तिकिट दर होता,तोच कायम ठेवावा,प्रवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन लूट करू नये.जे लुट करत आहेत अशा वाहानावर योग्य कार्यवाही केली जावी.अशीही मागणी करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!