श्यामलाल हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा !
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालदिन ‘ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक माननीय श्री चोब ळे आनंद सर, तसेच श्री शेख सर श्री नादरगे सर, चेरेकर सर उपस्थित होते. बाल दिनाच्या निमित्ताने शाळेतील बालक, बालिका जायभाये दिव्या, पाटील धनश्री, गरड प्रणिता, गायकवाड पवन, पाटील स्वराज, रावणगावे सोमेश व इतर विद्यार्थी यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले.
बाल दिनानिमित्त मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची ओळख उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. पंडित नेहरूंना मुले खूप आवडायची त्यामुळे त्यांचा जन्मदिन देशभर बालक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.