औरादकरांना अक्का फाऊंडेशन आणी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून ऑक्सिजन किटची दिवाळी भेट
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन किट वाटपात योगदान देण्यात आले
औराद शहा (भगवान जाधव) : निलंगा तालुक्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतुन तसेच अक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मदत करीत भविष्यात निलंगा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना अडचणी विना लवकर उपचार कसे मिळवता येतील या माध्यमातून औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयास १५ तर निलंगा उपजिल्हा रुग्णालयास २० काँसंट्रेटर देण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून घरपोच ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेल्या काँसंट्रेटरमुळे मोठे सहकार्य झाले होते. बहुतांश रुग्णाला या केलेल्या उपक्रमामुळे उपचार घेण्यासाठी चांगली सोय झालेली होती म्हणून भविष्या त रुग्णांना टंचाई होऊ नये म्हणून माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून व त्यांना आक्का फाउंडेशन व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या मदतीने जवळपास ३५ ऑक्सिजन किट हे दिवाळी भेट म्हणुन वितरण करण्यात आले.
औराद शहाजानी येथे ऑक्सिजन किटचे स्वीकार करताना डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. गौस शेख व वैद्यकीय कर्मचारी तसेच या सर्व ऑक्सीजन किटची भेट देताना शहर अध्यक्ष राजा पाटील, डॉ. मल्लिकार्जुन शंकद, माजी जिल्हा परीषद सदस्य व्यंकट गिरी, ग्रा.पं.सदस्य शिवपुत्र आगरे, गिरबणे सर , भगवानदास लड्डा, व्यापारी निर्भय पिचारे, अर्शद पटेल, वजीर पठाण, प्रताप कांबळे, अमोल सुर्यवंशी, मुस्ताक नाईकवाडे, सिराज नाईकवाडे, अब्बास निळकंठे व इतर नागरीक उपस्थित होते.