महिलांनी कौटुंबिक अन्याय सहन न करता अभय केंद्रात तक्रार करा – सौ. प्रीती शेलोकार

महिलांनी कौटुंबिक अन्याय सहन न करता अभय केंद्रात तक्रार करा - सौ. प्रीती शेलोकार

अभय केंद्र व जयश्रीताई राठोड मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने घेतले शिबीर

महागाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तीवरंग कौटुंबिक हिंसाचार कायदा व संरक्षण मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. सौ जयश्रीताई राठोड मित्रपरिवार व अभय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कायदेविषयक शिबीर कार्यक्रमाला सुरुवात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ जयश्री राठोड होत्या तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून तालुका महिला संरक्षण अधिकारी सौ प्रीती शेलोकार यांनी मार्गदर्शन केले असून त्यांनी महिलावरील कौटुंबिक अत्याचारामध्ये सध्या वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा पीडित महिलांना आधार ठरत असून आम्ही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला मुलीसाठी मदत करत असून या कायद्याच्या आधारे महिलाना अभय केंद्रा मार्फ़त मदत करत असतो. तर महिलांवर घरगुती कौटुंबिक अत्याचार होत असेल तर त्या महिलांनी अन्याय सहन न करता समोर येऊन आमच्याकडे म्हणजे अभय केंद्रात तक्रार द्याव्यात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे ही ते मार्गदर्शनाच्यावेळी म्हणाल्या, सोबतच आज घडीला महिलां,मुलीवर घरगुती हिंसाचार वाढत असुन या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असुन कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा २००५च्या अंमलबजावणी करिता तालुकास्तरावर अभय केंद्राची निर्मिती करून या याठिकाणी शासनाने संरक्षण अधिकारी कार्यरत केले आहेत या संरक्षण अधिकारी व केंद्राद्वारे घरगुती हिंसाचार रोखणे, घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना त्यांची इच्छा असेल तर प्रकरण न्यायालयात दाखल करून विधी सेवा प्राधिकरणामार्फत न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसेच कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या महिलांना आरोग्य सुविधा,गरज पडल्यास पोलीस प्रशासनाची मदत मिळवुन देणे,राहण्याची सुविधा नसल्यास त्यांची आधार गृहात रवानगी करणे असे कार्य या अभय केंद्रामार्फत केले जाते असे ही यावेळी शेलोकार मार्गदर्शनात बोलताना म्हणाल्या.

सोबतच कौटुंबिक छळ म्हणजे छळ करणारी व्यक्ती ही एकाच घरात राहत असेल त्यांच्यात रक्ताचे, विवाहाचे, दत्तक किंवा एकत्र कुटुंबातून निर्माण झालेले नातेवाईक असतील व त्यात शारिरीक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक, स्त्रीधन, हुंडा किंवा मालमत्ता तसेच अपमानीत करणे, शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला वारंवार हिणवणे किंवा धमकावणे म्हणजेच हिंसाचार आहे याची सुद्धा मार्गदर्शनात माहिती दिली.या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार राम जाधव, जिल्हा परिषद मुख्याध्यापिका सौ वैशाली डोंगरे,भोसा ग्रामपंचायत सरपंच सौ.जयश्री चव्हाण, तीवरंग ग्रामपंचायत सदस्या सौ जरीना चव्हाण,सौ आशा चव्हाण,सौ सोनू आडे उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा राठोड, पूजा राठोड,वर्षा गायकवाड,रुपाली वाघमारे, अमोल कौडकर,रवी जाधव,खुशाल पवार,रैना पवार तसेच सौ जयश्रीताई राठोड मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोबीन चव्हाण यांनी केले तर रेखा राठोड यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!