गोंदेगाव ग्रामपंचायतीवर गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

गोंदेगाव ग्रामपंचायतीवर गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

दुरंगी लढत : नऊ पैकी सहा जागेवर एकतर्फी विजय
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचातीअंतर्गत गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनल व नवयुवक परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलला नऊपैकी सहा जागेवर दणदणीत विजय मिळाला तर विरोधी पॅनलला तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे. एकंदर गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार एकतर्फी विजय झालेले असल्यामुळे सत्तेची सुत्रे गोंदेगावच्या देशमुखांकडेच राहणार असल्याचे वास्तव चित्र असल्यामुळे गोंदेगावच्या विकासाला गती मिळणार आहे.
लातूर तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबासाहेब दादाराव देशमूख यांच्या नेतृत्वाखालील गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलला उभारण्यात आला. तर बळवंत साहेबराव देशमुख यांच्या नेतृत्वखाली नवयुवक पॅनल उभारण्यात आला. या दोन्ही पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलला नऊपैकी सहा जागेवर दणदणीत विजय मिळविता आला. तर विरोधी पॅनलला तीन जागेवरच समाधान मानावे लागले.
गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलच्या विजय उमेदवारामध्ये विश्‍वनाथ मसा खैरे, शरणप्पा स्वामी, ज्ञानोबा माधव बेडे, नितीन उत्तरेश्‍वर बेडे, जयराम तुकाराम सोनवने, पांडूरंग चंद्रेसन देशमूख आदींचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांचा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलचे सर्वेसर्वा बाबासाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब देडे, संगमेश्‍वर स्वामी, विक्रम देशमुख, विनायक स्वामी, योगेश स्वामी, श्रीराम देडे, अमोल देडे, आप्पा देडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!