आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते ‘सह्याद्री अमृततुल्य’ चे उद्घाटन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण भागातील युवा उद्योजक बल्लाळनाथ कणसे यांनी नव्याने सुरुवात केलेल्या ‘सह्याद्री अमृततुल्य’ चे उद्घाटन आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
लातूर तालुका चिंचोली (ब.) या छोट्याश्या गावातील तरुण बल्लाळनाथ कणसे यांनी ‘सह्याद्री अमृततुल्य’ ची सुरुवात केली. विशेषतः म्हणजे शहरातील गंजगोलाई परिसरात अल्पावधीतच सहाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या नवीन व्यवसायाबद्दल आनंद व्यक्त करून संचालक बल्लाळनाथ कणसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विजय देशमुख, अनिल पाटील, डी. एस. पाटील कामखेडकर, रविंद्र काळे, गजानन शेळके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.