रेड्डी समाजाचा सभागृह बांधकामासाठी दोन कोटी मंजूर

रेड्डी समाजाचा सभागृह बांधकामासाठी दोन कोटी मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : उदगीर शहराचा मागील दोन वर्षापासून जलद गतीने पायाभूत विकास होत आहे. या सोबतच शहरात लिंगायत भवन, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, बौद्ध विहार, मुस्लिम शादीखाना अशा विविध जाती धर्मांच्या नागरिकांसाठी बांधण्यात येत आहे. या सोबतच शासनाने यलम / रेड्डी समाजासाठी सभागृह बांधकामासाठी दोन कोटी मंजूर केले आहे. अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. लवकरच याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
मागील दोन वर्षापासून उदगीर शहरात पायाभूत विविध विकास कामे सुरू आहेत. यात इमारत, रस्ते, पुल, नळ योजना, लिंगायत भवन, मुस्लिम शादी खाना, बौध्दविहार, छत्रपती महाराज सांस्कृतीक सभागृह, यांचा समावेश आहे. अनेक दिवसांपासून शहरातील यलम समाजाची सभागृहाची मागणी होती. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांची तरतूद यलम सभागृहासाठी केली आहे. राज्य शासनाच्या वतीने उभे करणारे एकमेव सभागृह आहे. शहराचा विकासात आणखी भर घालण्याचे काम या यलम सभागृहाच्या मंजूरीने झाले आहे. लवकरच या कामाचा सुरुवात होणार आहे. रेड्डी समाजासाठी उपयुक्त असे सभागृह उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री यांनी दिली आहे.

About The Author