विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा – दिलीपराव देशमुख
निलंगा येथील जिल्हा बँकेच्या मतदारांचा सहकार पॅनल ला पाठिंबा
लातूर (प्रतिनिधी) : सहकाराचा संबंध थेट चुलीची आहे निगडित आहे सर्व सोसायट्यांना मदत करणारी हि जिल्हा बँक हि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे जसे धरण भरले की शेतीला पाणी मिळते. तशी जिल्हा बँक काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी असून मागच्या १० वर्षात जिल्हा बँकेने स्वतः च्या भागभांडव लावर जिल्ह्यातील शेतकरी सभासद, पतसंस्था, मजूर संस्था यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले हे करत असताना २५ वर्षात कुठलेही चुकीचे काम केले नाही पुढेही होऊ देणारं नाही असे स्पष्ट करून मतदारांनी जो आमच्यावर गेली २५ वर्षात विश्वास ठेवून आशिर्वाद दीले तोच आशिर्वाद येणाऱ्या २१ नोव्हेंबर रोजी लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सहकार पॅनल उमेदवारांना मतदान रूपी आशिर्वाद देऊन विरोधी पक्षाच्या पॅनल उमेदवारांचे डीपॉझिट जप्त करावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे ते निलंगा येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ सहकार पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर अँड श्रीपतराव काकडे, आबासाहेब पाटील, अभय साळुंके, विजयकुमार पाटील डी एन शेळके राजेन्द्र सूर्यवंशी उपस्थित होते.
तीन लाख रुपये बिन व्याजी कर्ज २० हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की आम्ही जे बोलतो ते करतो असे सांगून तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज वाटप केले तो २० हजार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्या मध्ये त्या सभासदांचे क्षेत्र असेल तर त्याला दिले जाईल असे सांगून ही सर्वांची काळजी घेणारी मातृसंस्था आहे. सर्वांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणारी बँक आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा बँक देशपातळीवरील एक नंबरची बँक करता आली, याचे समाधान आहे. आपल्याला दूरदृष्टीचे नेते मिळाले. शिवराज पाटील चाकूरकर साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, विलासराव देशमुख साहेब तसेच त्यांच्या आधीचे केशवराव सोनवणे, सखाराम माकणीकरसाहेब असो. असे अनेक नेते आपल्याला लाभले. जुना उस्मानाबाद जिल्हा असो की नवीन लातूर जिल्हा आपल्याकडे नेतृत्वाची खाण होती. ही खाण पारखणारी पारखी मतदार मंडळी होती. त्यामुळे आपला झपाट्याने विकास झाला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या योजना राबविल्या. पीककर्ज, पगारसंस्था वा इतर कोणत्याही संस्थांना मदत करताना दुसऱ्या बँकेचा एक रुपयाही घ्यावा लागला नाही. स्वतःच्या भाग भांडवलावर जिल्हा बँकेने हा डोलारा उभा केलेला आहे. अशी ही सक्षम बँक आहे. गेल्या १० वर्षात कुठल्याही बँका चे कर्ज न घेता जिल्ह्यातील शेतकरी सभासद, पतसंस्था, मजूर संस्था यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम सातत्याने केले आहे पुढेही बँक करणार आहे त्यासाठी आपल्या विचाराचे सक्षम लोक संचालक मंडळात असले पाहिजे त्यासाठी येणाऱ्या निवडणूकीत सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले
बँक खंबीर पाठीशी उभे राहील काळजी करू नका
बँकेच्या माध्यमातून शेतीसाठीच्या योजना, धोरणे राबविताना त्याचाही विचार करून शेतकऱ्यांना मदत केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी ही मदत करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून कोणतीही योजना राबविताना ती कागदावर राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली. यासाठी आम्ही नियम मोडला नाही तर तो काही प्रमाणात लवचिक करून शेतकऱ्यांना अडी अडचणीत असणाऱ्या सर्वांना मदत केली. बँक मातृसंस्था आहे, कल्पवृक्ष आहे. जिल्ह्यातील अनेकांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम जिल्हा बँकेने केले. यापुढेही माझ्या जिल्ह्यातील प्रत्येकाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी स्वप्न बघायची, बँक ती प्रत्यक्षात आणून त्यांची प्रगती साधण्याचे कार्य करेल. येणाऱ्या काळातही ते काम अधिक जोमाने करायचे आहे.सोयाबीन, तूर, हरभरा, ऊसउत्पादक आदींना पाच लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाणार आहे. विरोधकांनाही ही शेती असेल, ते शेती करत असतील, स्वतःचा सातबारा असेल तर त्यांनीही या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्याकडचे सहकार पॅनेलमधील 19 पैकी 16 उमेदवार उच्चशिक्षित आहेत. रिझर्व बँकेच्या नियमानुसारच आपण उमेदवारी दिली आहे येणाऱ्या २१ तारखेला मतदाना दिवशी सहकार पॅनल उमेदवारांच्या त पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत विरोधकांचे डीपॉझिट जप्त करून त्यांची जागा दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.
पेटत्या चुलीवर पाणी टाकणाऱ्या विरोधकांना मतदान पेटीतून धडा शिकवा – आमदार धीरज देशमुख
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मागच्या ३५ वर्षात हजारोचा व्यवहार असलेला कोटी रुपयांवर नेऊन ठेवला विकासाला चालना जिल्हा बँकेमुळे मिळाली सहकार क्षेत्र वाढले साखर कारखानदारी वाढल्याने आर्थिक सुबत्ता मिळाली प्रपंचाची चूल पेटली असताना विरोधी लोक पॅनल चे मात्र चुलीत पाणी ओतायचे काम करीत आहेत त्यासाठी त्यांना मतदानातून खडसावले पाहिजे व येणाऱ्या निवडणूकीत सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतदान करून विरोधकांचे डि पॉ झिट जप्त करून त्यांची जागा दाखवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वातावरण दूषित करणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा – अशोकराव पाटील निलंगेकर
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात अग्रेसर असलेल्या बँके पैकी बँक आहे पण विरोधक मात्र बेछूट आरोप करत सुटले ज्यांना बँके बद्दल अभ्यासच नाही कधी सहकारातील माहिती नाही असा टोला विरोधकांना लगावत माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सक्षमपणे उभी असलेल्या लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी येणाऱ्या मतदाना दिवशी आशीर्वाद द्यावेत असे सांगून वातावरण दूषित करणाऱ्या विरोधकांना मतदानातून त्यांनी जागा दाखवावी असे आवाहन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी अँड श्रीपतराव काकडे, अशोक गोविंदपूरकर, दिलीप पाटील नागराळकर,विजयकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी निलंगा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार धीरज देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सहकार पॅनल चे उमेदवार पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, सौ स्वयं प्रभा पाटील सौ अनिता केंद्रे, सौ सपना किसवे, संभाजी सुळ, अँड हल्लाप्पा कोकने, उदयसिंह देशमुख, अँड बाबासाहेब गायकवाड, हरिराम कुलकर्णी, राजकुमार जाधव, सचिन दाताल, महेंद्र भादेकर, लक्ष्मण बोधले, सुरेंद्र धुमाळ, सतिश पाटील, दयानंद चोपणे, शेळके, मोरे, श्रीमंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या ार्यक्रमास तालुक्यातील, सोसायटी मतदार, पतसंस्था, मजुर संघ, सोसायटी चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.