सहकार पॅनल च्या उमेदवारांचा विजय विक्रमी मतांनी होण्यासाठी आशिर्वाद द्यावा

सहकार पॅनल च्या उमेदवारांचा विजय विक्रमी मतांनी होण्यासाठी आशिर्वाद द्यावा

चाकुर व अहमदपूर तालुक्यातील मतदार सभासदांच्या प्रचार बैठकीत मोठा प्रतिसाद

लातूर (प्रतिनिधी) : मागच्या २५ वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातुन शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठया प्रमाणावर मदत करत असताना कधीही राजकारण न करता सर्वानाच मदतीचा हात पुढे केला त्यामूळेच राज्यात लातूर जिल्हा बँक सक्षमपणे पुढे आली असून ज्या पद्धतीने मागच्या काळात आपण आशिर्वाद दीले तोच आशिर्वाद उद्याच्या २१ तारखेला सहकार पॅनल च्या ९ उमेदवारां च्या पाठीमागे मतदानरुपी द्यावेत असे सांगून १९ जागेपैकी १० जागा बिनविरोध निवडून आलेल्या असून अर्धी लढाई जिंकलेली आहे केवळ ९ उमेदवारांसाठी हि निवडणूक होत असली तरी विजय आपलाच आहे फक्त विक्रमी मतांनी विजयी होण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी आगामी काळात राज्यात नव्हे देशात जिल्हा बँकेचे नाव नावलौकीक राहील या पध्दतीने काम संचालक मंडळाच्या माध्यमातून होईल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी सहकार पॅनल चे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले ते शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ सहकार पॅनल उमेदवारां च्या प्रचारार्थ शिरूर ताज बंद येथे अहमदपूर व चाकुर तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन मतदार यांच्या समवेत प्रचार सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार बाबासाहेब पाटील आमदार धीरज देशमुख, सहकार पॅनल चे प्रमुख अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य मंचक राव पाटील, साहेबराव जाधव, शिवानंद हेंगणे, जिल्हा बँकेचे संचालक एन आर पाटील, मारुती पांडे किशोर मुंढे, सहकार पॅनल चे उमेदवार पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंद पूरकर, दिलीप पाटील नागराळकर अनुप शेळके, सौ स्वयं प्रभा पाटील सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, चंद्रकांत मद्दे, सांब महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा बँकेची बांधिलकी शेतकऱ्यांशी

गेली २५ ते ३० वर्ष झाली बँकेने कधीही राजकारण केले नाही सोसायटी चेअरमन हा कुन्या पक्षाचा गटातटा चा आहे हेही बघितले नाहीं कारण यात राजकारण केले तर सगळ्या गावातील शेतकऱ्यांना त्रास होतो त्यामुळे सर्वानाच मदतीचा हात पुढे केला आहे त्यात अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असून अनेक मुल परदेशात जाऊन शैक्षणीक कर्ज काढून त्यांना मोठया पदावर विराजमान झालेली दिसत आहे हे खरे समाधान त्यांचे चेहऱ्यावरील हास्य हेच आम्हाला समाधान आहे आशा अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे काम बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून केले आहे पुढेही चालूच राहणार आहे दुर्देवाने काही लोक बँकेच्या कारभारात राजकारण आणून बदनामी अफवा पसरवल्या जात आहेत याला थोपवण्याची गरज आहे यासाठी येणाऱ्या निवडणुकीत सहकार पॅनल चे सर्व ९ उमेदवारांना आशीर्वाद देवुन विरोधकांचे डीपॉझीट जप्त करून त्यांची जागा दाखवां असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवारांनाही निर्णायक मतांनी विजयी करून विक्रम करावा – आमदार धीरज देशमुख

लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात बँकेचा व्यवहार सुरळीत, पारदर्शकपणे सुरु आहे. ही विकासाची वैचारिक लढाई आहे. पण विरोधकांकडे विकासाची मुद्दे, धोरण नाही. केवळ द्वेषापोटी राजकारण केले जात आहे. याचा हिशोब मतपेटीतून मतदारांनी व्यक्त करावा ही वेळ आहे असे सांगून, पशुपालक यांच्यासह सर्वसामान्यांना शिक्षण, आरोग्य, लग्न यांना अनेक योजनांचा लाभ दिला आहेच. यापुढेही येणाऱ्या नूतन संचालक मंडळाकडून मोठ्या आशा आहेत. त्या आशेला खरे उतरण्याचे काम संचालक मंडळ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यासाठी मतदारांनी सहकार पॅनल उमेदवारांस भरघोस मतांनी विजयी करुन खंबीर साथ द्यावी. असे आवाहन त्यांनी केले आहे

लाखोंचा पोशिंदा ठरलेली लातूर जिल्हा बँक दिलीपराव साहेबांच्या हाती होती आणि यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती आदरणीय दिलीपराव साहेबांच्या हाती राहील, असा मला विश्वास आहे. यापुढेही काकांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक लातूरला अधिक सुजलाम, सुफलाम करण्याचे काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहकार क्षेत्रात खीळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना बाजूला सारा

राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा बँक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शन खाली बँकेने ऐतिहासिक निर्णय घेवून शेतकरी सभासदांना न्याय देण्याचे कार्य केले आहे त्यामूळे शेतकरी सुखी समाधानी आहे अनेक धाडसी पाऊल टाकत लोकांना आधार देण्याचे काम केले आहे त्यामूळे विरोधी पक्षाच्या पॅनल प्रमुख सहकार क्षेत्रातील चांगल्या संस्थेला बदनाम करून खीळ घालण्याच्या दृष्टीने निवडणूकीत उतरले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून सहकार पॅनल उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

पुनर्वसनातून विश्व निर्माण करणारी लातूर जिल्हा बँक – अँड श्रीपतराव काकडे

एकेकाळी लातूर जिल्हा बँकेकडे केवळ १७ कोटी रुपये भागभांडवल होते आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शन खाली बँकेने अनेक धाडसी निर्णय घेवून १०० कोटी रुपये पिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच सहकार चळवळ उभी केली आहे एक चांगली सक्षम बँक लातूर चे नाव देशभरात नावलौकिक मिळविला आहे हे आपण जापल पाहिजे असे सांगून दुसरीकडे विरोधी पक्षाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने अफवा संभ्रम निर्माण करण्याचे काम निवडणूकीत सुरू आहे हे आपण येणाऱ्या निवडणुकीत सहकार पॅनल उमेदवारांना बहुमतांनी विजयी करून विरोधकांना मतपेटितून त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. या संवाद मेळाव्यास चाकुर व अहमदपूर तालुक्यातील मतदार, सहकारी संस्थेचे चेअरमन, मजूर संस्था पतसंस्था मतदार, उपस्थित होते.

About The Author